Pune Crime | ‘आमच्या गॅंगसोबत का राहत नाहीस?’ पुण्यात तरुणाला मारहाण करणारा गुंड जेरबंद

तरुणाला धमकावून मारहाण करणाऱ्या पुण्यातील गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोन पथकाने ही कारवाई केली. 22 वर्षीय सल्ल्या ऊर्फ सलमान हनिफ शेख याला जेरबंद करण्यात आलं आहे.

Pune Crime | 'आमच्या गॅंगसोबत का राहत नाहीस?' पुण्यात तरुणाला मारहाण करणारा गुंड जेरबंद
पुण्यात गुंडांचा हैदोसImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 7:45 AM

पुणे : तरुणाला दमदाटी करत पाया पडायला लावणाऱ्या पुण्यातील गुंडाच्या (Pune Crime) मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट दोन पथकाने कारवाई केली. सल्ल्या ऊर्फ सलमान हनिफ शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. धनकवडी भागात बालाजीनगर परिसरातील एका तरुणाला जबर मारहाण (Youth beaten up) करत त्याला पाया पडायला लावलं होतं. त्यानंतर या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या टोळीतील एकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तू आमच्या गँगसोबत का राहत नाहीस, असं विचारत गुंडांनी (Goons) भाजीवाल्याला लोटांगण घालायला लावल्याचं समोर आलं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करुन गुंडांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गुंडांच्या दादागिरीचे व्हिडीओ अनेक वेळा समोर येताना दिसतात. नुकत्याच समोर आलेल्या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता.

काय आहे प्रकरण?

तरुणाला धमकावून मारहाण करणाऱ्या पुण्यातील गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोन पथकाने ही कारवाई केली. 22 वर्षीय सल्ल्या ऊर्फ सलमान हनिफ शेख याला जेरबंद करण्यात आलं आहे.

‘आमच्या गॅंगसोबत का राहत नाहीस?’

सल्ल्या शेख आणि त्याच्या तीन ते चार साथीदारांनी एका तरुणाला “तू पूर्वी आमच्या गॅंगसोबत राहत होतास, आता का राहत नाहीस’ अशी धमकी देत मारहाण केली होती. तसंच त्याला भर रस्त्यात पायाही पडायला लावलं होतं. आपान शेख याने या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ तयार केला होता.

या घटनेनंतर आरोपींनी हातामध्ये तलवार, कोयते, लोखंडी सळई घेऊन परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. याचेही व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते.

संबंधित बातम्या :

Ambernath | आईला मारहाण करणाऱ्या दारुड्या बापावर पोरांचा संताप, एकदाची अद्दल घडवली

Bar Dancer Attacked | मुंबईत बारबालेसह बहिणीवर ब्लेड हल्ला, एक्स बॉयफ्रेण्ड पसार

Kolhapur CCTV | रस्त्याने शांतपणे चाललेली महिला, कुत्रा मागून धावत आला आणि लचके तोडले

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.