Jeweler Robbery CCTV | पुण्यात कोयत्याच्या धाकाने सराफाची लूट, 73 हजारांच्या सोनसाखळ्यांची चोरी
सराफा व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून लुटण्यात आले. 73 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबवले. ही घटना पुणे जिल्ह्यात लोहगाव परिसरात घडली आहे
पुणे : पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटना (Pune Crime) वाढताना दिसत आहेत. चोरट्यांना पुणे पोलिसांचा धाकच राहिला नाही, असा सवाल उपस्थित करणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. हातात कोयते घेऊन रस्त्यावर नागरिकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या टोळ्या पुण्यात सक्रिय झाल्या आहेत. पुण्यातील लोहगाव परिसरात चक्क सराफ व्यावसायिकाच्या (Jeweler Robbery) गळ्याला कोयता लावून लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सराफाच्या दुकानातून 73 हजार रुपये किमतीच्या दोन सोनसाखळ्या लांबवण्यात आल्या आहेत. विमाननगर पोलीस या चोरी प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
काय आहे प्रकरण?
सराफा व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून लुटण्यात आले. 73 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबवले. ही घटना पुणे जिल्ह्यात लोहगाव परिसरात घडली आहे. या घटनेनंतर या व्यावसायिकाने विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
आझाद चौकात महाले ज्वेलर्स सराफमध्ये दोन चोरटे दुकानात शिरले. त्यांनी दागिने खरेदी करण्याचा बहाणा केला. यावेळी एकाने सराफा व्यापाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवला, तर दुसऱ्या चोरट्याने पकडून ठेवलं.
जीवे मारण्याची धमकी देऊन 73 हजार रुपये किमतीच्या दोन सोनसाखळ्या लांबवल्या आहेत. याबाबत विमाननगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
पाहा व्हिडीओ :
Jeweler Robbery CCTV | पुण्यात कोयत्याच्या धाकाने सराफाची लूट, 73 हजारांच्या सोनसाखळ्यांची चोरी #Pune #Crime pic.twitter.com/Y29LxIlk6f
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 6, 2022
संबंधित बातम्या :
Delhi CCTV | ‘मॉर्निंग वॉक’ला निघालेल्या दोघांना अडवलं, भररस्त्यात लुटीचा थरार
तरुणींसोबत मजा मस्ती करण्यासाठी आठ लाखांची चोरी, मुंबईत 28 वर्षीय कार ड्रायव्हरला अटक
पुण्यात विद्यार्थ्याला मारहाण, 50 हजारांची लूट, बेसबॉल बॅटने कार फोडली