परदेशात नोकरीच्या आमिषाने फसवणूक, किरण गोसावी विरोधात 400 पानी दोषारोपपत्र, 82 साक्षीदारांचा तपास

किरण गोसावीच्या विरोधात काही दिवसांपूर्वीं पुण्यातली भोसरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परदेशात नोकरी लावण्याच्या बहाण्याने 2015 मध्ये पैसे घेतल्याचा आरोप एका तरुणाने केला होता.

परदेशात नोकरीच्या आमिषाने फसवणूक, किरण गोसावी विरोधात 400 पानी दोषारोपपत्र, 82 साक्षीदारांचा तपास
किरण गोसावी
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 12:17 PM

पुणे : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अटक झाली, त्या कॉर्डेलिया क्रूझवरील कारवाई प्रकरणात बहुचर्चित ठरलेला कथित पंच किरण गोसावी (Kiran Gosavi) याच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. किरण गोसावीच्या विरोधात पुण्यातील फरासखाना पोलिसांनी जवळपास 400 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलं आहे. पुण्यातील एका तरुणाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून किरण गोसावी याने तिची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तरुणांनी फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी चौकशी करुन 82 साक्षीदार तपासले आहेत. गोसावीच्या विरोधात पुणे न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्यात गोसावीला अटक करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण?

किरण गोसावीच्या विरोधात काही दिवसांपूर्वीं पुण्यातली भोसरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परदेशात नोकरी लावण्याच्या बहाण्याने 2015 मध्ये पैसे घेतल्याचा आरोप एका तरुणाने केला होता. ब्रुनेई इथं हॉटेलमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत गोसावी याने विजय कुमारकडून 2 लाख 25 हजार रुपये उकळले होते. मात्र अद्याप नोकरी लावली नाही. या प्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने गोसावीविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती.

किरण उर्फ के. पी. गोसावी नेमका कोण?

किरण गोसावी हा परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्स रिक्रूटमेंट कंपनीचा मालक असल्याची माहिती आहे. के. पी. जी. ड्रीम्स कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी याची ओळख आहे.

गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय नवाब मलिक यांनीही तसा दावा केला होता.

संबंधित बातम्या :

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावीला अटक

Pune Crime | किरण गोसावीच्या अडचणीत वाढ; दुबईवरून आलेल्या महिला साथीदाराला अटक

किरण गोसावी विरोधात पुणे पोलिसांत आणखी चार तरुणांच्या तक्रारी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.