लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने त्रस्त, पुण्यातील जीवरक्षक तरुणाने आयुष्य संपवलं

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेला लॉकडाऊन, सततच्या निर्बंधामुळे दत्ताची नोकरी गेल्याची माहिती आहे. याच कारणामुळे तो त्रस्त होता, असंही बोललं जातं.

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने त्रस्त, पुण्यातील जीवरक्षक तरुणाने आयुष्य संपवलं
पुण्यातील आत्महत्या करणारा तरुण
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 1:02 PM

पुणे : नोकरी गेल्याने आलेल्या नैराश्यातून तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लाईफगार्ड म्हणून काम करणारा तरुण लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने त्रस्त होता. यातूनच त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. पुण्यात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सततच्या निर्बंधामुळे नोकरी गेली

पुणे शहरातील केशवनगर मुंढवा येथे राहणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली. दत्ता पुशीलकर असं टोकाचं पाऊल उचलणाऱ्या तरुणाचं नाव आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेला लॉकडाऊन, सततच्या निर्बंधामुळे दत्ताची नोकरी गेल्याची माहिती आहे. याच कारणामुळे तो त्रस्त होता, असंही बोललं जातं.

नोकरी गेल्याने कौटुंबिक कलह

दत्ता पुशीलकर हा पुण्यातील नांदे तलावाचा जीवरक्षक म्हणून काम करत होता. 2020 पासून काम नसल्याने कौटुंबिक कलह वाढल्याचंही बोललं जातं. अखेर कंटाळून काल त्याने आपल्या आयुष्याची अखेर केल्याचं समोर आलं आहे. कोणे एके काळी इतरांच्या जीवाचं रक्षण करणाऱ्या उमद्या तरुणाने स्वतःचंच जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

आधी वडील गेले, मग काकी; कोरोनाने नोकरी खाल्ली, दुःखाचा डोंगर फोडणाऱ्या तरण्याबांड लेकालाही अखेर नियतीने हिरावलं

दारासमोर भीक मागितल्याने राग अनावर, भिक्षुकाची निर्घृण हत्या, मृतदेह गटाराजवळ फेकला

बॉयलरची सफाई करताना हलगर्जी, पुण्यात उकळतं पाणी पडून चौघे भाजले, एकाचा मृत्यू

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.