अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, पुण्यात जन्मदात्रीकडून तीन महिन्यांच्या बाळाचा खून

तीन महिन्यांच्या मुलीचे घरातून अपहरण झाल्याची तक्रार आईने केली होती. मात्र आपल्या बाळाचा तिनेच गळा दाबून खून केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आईला अटक केली असून अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे.

अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, पुण्यात जन्मदात्रीकडून तीन महिन्यांच्या बाळाचा खून
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 9:28 AM

पुणे : बाळाचे अपहरण झाल्याची तक्रार करणाऱ्या आईनेच त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जन्मदात्या आईनेच तीन महिन्यांच्या चिमुकल्याचा निर्घृण खून केल्याचा आरोप आहे. पुण्यात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

तीन महिन्यांच्या मुलीचे घरातून अपहरण झाल्याची तक्रार आईने केली होती. मात्र आपल्या बाळाचा तिनेच गळा दाबून खून केल्याचे उघडकीस आले आहे.

“नातेवाईकांना काय सांगायचे?”

संबंधित महिला घटस्फोटीत आहे. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलीबाबत नातेवाईकांना काय सांगायचे, या प्रश्नातून या महिलेने हा खून केल्याचा आरोप केला जात आहे.

आईला अटक, अल्पवयीन मुलगा ताब्यात

आपल्या 13 वर्षांच्या मुलाच्या मदतीने महिलेने तीन महिन्याच्या मुलीचा गळा दाबला. त्यानंतर तिला पुण्यातील बंडगार्डन पुलावरून नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आईला अटक केली असून मुलालाही ताब्यात घेतले आहे.

टाकीत बुडवून आईकडून बाळाची हत्या

दुसरीकडे, मध्य प्रदेशातील उज्जैनमधील खाचरोड येथे एका आईने आपल्या 3 महिन्यांच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. आईने गुगलवर बाळाची हत्या करण्याची पद्धत सर्च केली होती. ही घटना 12 ऑक्टोबरला घडली होती, मात्र दहा दिवस पोलिसांना गुंगारा देणारी निष्ठुर आई अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडली. खाचरोड येथील घराच्या तिसऱ्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीत मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मुलीच्या आई स्वातीला खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे.

हे ही वाचा :

दहा दिवस पोलिसांना गुंगारा, पोटच्या पोरीला टाकीत बुडवून मारणारी आई Google मुळे कशी सापडली?

अमरावतीत आर्थित विवंचनेतून शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या, मन सुन्न करणारी सुसाईड नोट समोर

8 ते 11 वर्षाच्या मुलांकडून 6 वर्षीय चिमुकलीसोबत भयावह कृत्य, आपली वाटचाल नेमकी कुठल्या दिशेला चाललीय?

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.