कामगारांच्या पगाराचे पैसे नेणाऱ्या ड्रायव्हरची पुण्यात लूट, तिघा जणांना अटक

दरोडा प्रकरणाचा तपास करताना दरोडा विरोधी पथकाला ड्रायव्हर अभिषेक शिरसाठ याच्यावर संशय आला. त्यानंतर चौकशी केली असता त्यानेच आपल्या मित्रांना पैसे घेऊन जात असल्याची माहिती दिली होती.

कामगारांच्या पगाराचे पैसे नेणाऱ्या ड्रायव्हरची पुण्यात लूट, तिघा जणांना अटक
दरोडा प्रकरणी तिघांना अटक
Follow us
| Updated on: Sep 05, 2021 | 8:14 AM

पिंपरी चिंचवड : मौज मजा करण्यासाठी दरोडा टाकणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. कामगारांच्या पगाराचे पैसे घेऊन जात असताना वाल्हेकर वाडी भागातील साई स्टील कंपनीच्या चालकाला काही दिवसांपूर्वी मारहाण करुन लुटण्यात आले होते.

दरोडा प्रकरणाचा तपास करताना दरोडा विरोधी पथकाला ड्रायव्हर अभिषेक शिरसाठ याच्यावर संशय आला. त्यानंतर चौकशी केली असता त्यानेच आपल्या मित्रांना पैसे घेऊन जात असल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी या माहितीच्या आधारे कासीम खुर्शीद, यश गणेश आगवणे आणि सागर आदिनाथ पवार यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चार लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे.

पुण्यात सराईत वाहन चोराला अटक

दरम्यान, सराईत वाहन चोराला अटक करण्यात वाकड पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दहा गुन्हे उघड करत दोन लाख 80 किंमतीच्या तब्बल 13 दुचाकी जप्त केल्या आहेत. शुभम बजरंग काळे असे अटक करण्यात आलेल्या सराईत वाहन चोराचे नाव आहे.

आरोपी शुभम काळे हा काळाखडक, वाकड या ठिकाणी काही दुचाकींचे हँडल लॉक तपासून पाहत होता. यावेळी पेट्रोलिंग करत असलेल्या वाकड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता आरोपीने पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

त्याच्यावर दहा गुन्हे उघड झाले असून तब्बल 13 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत, यापैकी काही दुचाकी केज, बीड येथून पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत

पुण्यातील हडपसरमध्ये बंगल्यात घरफोडी 

दरम्यान, पुण्यातील हडपसरसारख्या गजबजलेल्या भागातील बंगल्यात घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना गेल्या महिन्यात उघडकीस आली होती. यामध्ये 88 लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती आहे. विवेक वसंतराव चोरघडे यांचा शेवाळ वाडीत बंगला आहे. त्यांचा शेतीचा व्यवसाय आहे. 9 ऑगस्टला विवेक चोरघडे आपल्या कुटुंबीयांसह दक्षिण भारत फिरायला गेले होते. 19 ऑगस्टला ते पुण्यात परतले. तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचं लक्षात आलं. त्यात जवळपास 155 तोळे सोनं, 2 किलो चांदी, साडेसहा लाख रुपयांचे विदेशी चलन आणि 40 हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला आहे.

लोणावळ्यात डॉक्टरांच्या घरात सशस्त्र दरोडा

दुसरीकडे, लोणवळ्यात वरिष्ठ डॉक्टरांच्या घरात सशस्त्र दरोडा पडल्याचा धक्कादायक जून महिन्यात समोर आला होता. डॉ हिरालाल खंडेलवाल आणि त्यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून हात-पाय बांधून सहा दरोडेखोरांनी चोरी केली होती. दरोडेखोर दोरखंडाने खाली येताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. त्यानंतर महिनाभराने पोलिसांनी मुंबईसह मध्य प्रदेशातून १५ जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या होत्या.

पुणे जिल्ह्यात लोणावळा परिसरातील प्रधान पार्क भागात डॉ हिरालाल खंडेलवाल आणि त्यांची पत्नी विजया खंडेलवाल राहतात. दरोडेखोरांनी खंडेलवाल दाम्पत्याच्या घरात प्रवेश करुन त्यांचे हात-पाय बांधले आणि सशस्त्र दरोडा टाकला होता. आरोपी मुंबईतील फिल्मसिटीमध्ये काम करणारे मजूर असल्याचं समोर आलं होतं. त्यांच्याकडून तीस लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला होता.

संबंधित बातम्या :

पुण्यात हडपसरमध्ये बंगल्यात चोरी, 155 तोळे सोन्यासह 88 लाखांचा ऐवज चोरीला

CCTV VIDEO | लोणवळ्यात डॉक्टरांच्या घरात सशस्त्र दरोडा, दाम्पत्याला बांधून 66 लाखांची लूट

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.