पिंपरीत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, तीन महिलांची सुटका

वाकड परिसरात स्पा सेंटरमधील देह व्यापाराचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला. या कारवाईत सामाजिक सुरक्षा विभागाने तीन महिलांची सुटका केली.

पिंपरीत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, तीन महिलांची सुटका
वाकडमध्ये स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 9:16 AM

पिंपरी चिंचवड : पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. वाकड परिसरात स्पा सेंटरमधील देह व्यापाराचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला. या कारवाईत सामाजिक सुरक्षा विभागाने तीन महिलांची सुटका केली. वाकडमधील इवंटी स्पा (evantee spa) सेंटरमध्ये हा प्रकार सुरु होता.

पिंपरीत याआधीही स्पा सेंटरमध्ये देह व्यापार

याआधीही पुण्यामध्ये वेश्या व्यवसायाच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. त्यावेळी वेश्या व्यवसाय करणाऱ्या चार तरुणींची सुटका करण्यात आली होती. तर त्यांच्याकडून देह व्यापार करुन घेणाऱ्या दोघा जणांना सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी अटक केली होती. पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी भागात ग्रीन विलेज स्पा सेंटरमध्ये हा प्रकार घडला होता.

वेश्या व्यवसाय करणाऱ्या चार तरुणींना आणि त्यांच्याकडून व्यवसाय करुन घेणाऱ्या दोघा जणांना सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या होत्या. पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी भागात ग्रीन विलेज स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी चौघी तरुणींची सुटका केली. तर स्पा चालक दीपक साळुंखे आणि अमित काटे या दोघा आरोपींना अटक करण्यात आली होती.

पिंपरीतील बार आणि लॉजवर छापेमारी 

याआधी, पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने रात्री बार आणि लॉजवर छापेमारी केली होती. जगताप डेअरी परिसरातील अॅलो गॅस्ट्रो लॉज आणि एटीन डिग्री रुफ टॉप हॉटेल अँड बारवर पोलिसांनी धाड टाकली होती. यावेळी 200 हून अधिक तरुण-तरुणींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं होतं.

लॉज-बारमध्ये काय सुरु होतं?

कोव्हिडसंबंधी नियमांचे उल्लंघन करुन अॅलो गॅस्ट्रो लॉज आणि 18 डिग्री रुफ टॉप बार सुरु होते. दारु पिऊन आणि इतर मादक पदार्थांचं सेवन करुन तरुण-तरुणी वीकेण्ड पार्टी साजरी करत होते. अॅलो गॅस्ट्रो लॉजमधून 113, तर एटीन डिग्री रुफ टॉप हॉटेल अँड बारमधून 105 तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

नालासोपाऱ्यात चाळीत सेक्स रॅकेट

दुसरीकडे, नालासोपाऱ्यात चाळीतील खोलीत चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात नुकतंच पोलिसांना यश आलं आहे. खोलीत तरुणींना डांबून ठेवून, त्यांना जबरदस्ती वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं जात असल्याचा आरोप आहे. नालासोपाऱ्यातील वालीव पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला.

चार पीडित मुलींची सुटका

नालासोपारा पूर्व पेल्हार गावातील खान कम्पाउंडमध्ये संबंधित महिला हे सेक्स रॅकेट चालवत होती. ती भाभी नावाने परिचित होती. वालीव पोलिसांनी छापा मारुन या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. यातील चार पीडित मुलींची सुटका करण्यात आली, तर दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

दोन लाखांचे निरोध सापडले

अटकेतील आरोपींमध्ये एका तृतीयपंथीयाचा, तर एका महिलेचा समावेश आहे. वसुंधरा संजय तिवारी (वय 48) आणि अंजली राजकुमार यादव (वय 45) असे अटक आरोपींची नाव असून वसुंधरा तिवारी ही तृतीयपंथी आहे. या आरोपींकडून 2 लाख 53 हजार 440 रुपये किमतीचे निरोध (कंडोम्स) असलेले 22 मोठे बॉक्स, रोख रक्कम आणि मोबाईल ही जप्त केले आहेत.

संबंधित बातम्या :

पिंपरीतील स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, चौघींची सुटका, स्पा चालक अटकेत

पुण्यात बनावट ग्राहक पाठवून लॉजवर छापा, देह व्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश, तिघींची सुटका

नालासोपाऱ्यातील चाळीत वेश्या व्यवसाय, महिलेसह तृतीयपंथीयाला बेड्या, दोन लाखांचे कंडोम सापडले

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.