लग्नाच्या आमिषाने विवाहित पोलीस उपनिरीक्षकाकडून बलात्कार, कोथरुड पोलिसात तक्रार

पुण्यातील पोलीस उपनिरीक्षक स्वतः विवाहित असताना सुद्धा त्याने 25 वर्षांच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून गेल्या दोन वर्षापासून तो बलात्कार करत असल्याचा आरोप आहे.

लग्नाच्या आमिषाने विवाहित पोलीस उपनिरीक्षकाकडून बलात्कार, कोथरुड पोलिसात तक्रार
एम्सच्या वरिष्ठ डॉक्टरकडून महिला सहकाऱ्यावर अत्याचार
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 1:59 PM

पुणे : तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पोलीस उपनिरीक्षकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. प्रवीण जरदे असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी प्रविण नागेश जर्दे (रा. शांतीबन सोसायटी, कोथरुड) हा सध्या पुण्यातील वाहतूक शाखेतील येरवडा विभागात कार्यरत आहे. प्रवीण स्वतः विवाहित असताना सुद्धा 25 वर्षांच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून गेल्या दोन वर्षापासून तो बलात्कार करत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

तक्रारदार तरुणीशी ओळख आणि प्रेम

2019 मध्ये प्रवीण जरदे हा कोथरुड पोलिसात कार्यरत होता. पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी आलेल्या एका तरुणीची आणि त्याची ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात होऊन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तो दोन वर्षांपासून बलात्कार करत होता.

मुंबईतील महिला पोलीस अधिकाऱ्याचाही आरोप

दुसरीकडे, लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याचा आरोप मुंबईतील महिला पोलीस अधिकाऱ्याने काही महिन्यांपूर्वी केला होता. बँक अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीविरोधात पवई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बलात्कारासह धमकी आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणी पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याने एकूण तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.

सोशल नेटवर्किंग साईटवर ओळख

मुख्य आरोपी मूळ औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. आपण बँक अधिकारी असल्याचा दावा त्याने केला आहे. सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून तक्रारदार महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि आरोपीची ओळख झाली. त्यानंतर दोघं रिलेशनशीपमघ्ये होते. आरोपीने पीडितेसोबतच्या खासगी क्षणांचे व्हिडीओ चित्रिकरण केले. त्यानंतर तिला त्रास देत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, असा उल्लेख एफआयआरमध्ये केला आहे.

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देत आरोपी आणि त्याच्या दोघा सहकाऱ्यांनी पीडितेचे ब्लॅकमेलिंग केले, असा आरोपही करण्यात आला आहे. त्रासाला कंटाळून महिलेने शुक्रवारी पवई पोलिसात तक्रार नोंदवली. बलात्कार आणि फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

मुंबईतही महिला पोलिसाचा अधिकाऱ्यावर आरोप

दरम्यान, लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्या प्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्याने पुरुष पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार नोंदवल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. मुंबईतील डोंगरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. लग्नाचे आमिष दाखवून पोलीस अधिकाऱ्याने तक्रारदार महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता.

संबंधित बातम्या :

लग्नाच्या आमिषाने महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार, डोंगरीत पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा

नांदेडच्या पोलीस निरीक्षकाकडून बलात्कार, वाशिममधील महिला पोलीस शिपायाच्या आरोपाने खळबळ

सोलापूरमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू, पतीकडून PSI सोबतच्या संबंधातून आत्महत्येचा दावा

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.