पुण्यात हडपसरमध्ये बंगल्यात चोरी, 155 तोळे सोन्यासह 88 लाखांचा ऐवज चोरीला

पुण्यातील हडपसरसारख्या गजबजलेल्या भागातील बंगल्यात घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये 88 लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती आहे

पुण्यात हडपसरमध्ये बंगल्यात चोरी, 155 तोळे सोन्यासह 88 लाखांचा ऐवज चोरीला
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 12:39 PM

पुणे : पुण्यातील हडपसर भागात घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे. सहलीनिमित्त परराज्यात गेलेल्या कुटुंबाच्या बंगल्यात जबरी चोरी झाली. 155 तोळे सोन्यासह 88 लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील हडपसरसारख्या गजबजलेल्या भागातील बंगल्यात घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये 88 लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती आहे. विवेक वसंतराव चोरघडे यांचा शेवाळ वाडीत बंगला आहे. त्यांचा शेतीचा व्यवसाय आहे.

155 तोळे सोन्यासह 88 लाखांची चोरी

9 ऑगस्टला विवेक चोरघडे आपल्या कुटुंबीयांसह दक्षिण भारत फिरायला गेले होते. 19 ऑगस्टला ते पुण्यात परतले. तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचं लक्षात आलं. त्यात जवळपास 155 तोळे सोनं, 2 किलो चांदी, साडेसहा लाख रुपयांचे विदेशी चलन आणि 40 हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला आहे.

लोणावळ्यात डॉक्टरांच्या घरात सशस्त्र दरोडा

दुसरीकडे, लोणवळ्यात वरिष्ठ डॉक्टरांच्या घरात सशस्त्र दरोडा पडल्याचा धक्कादायक जून महिन्यात समोर आला होता. डॉ हिरालाल खंडेलवाल आणि त्यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून हात-पाय बांधून सहा दरोडेखोरांनी चोरी केली होती. दरोडेखोर दोरखंडाने खाली येताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. त्यानंतर महिनाभराने पोलिसांनी मुंबईसह मध्य प्रदेशातून १५ जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या होत्या.

पुणे जिल्ह्यात लोणावळा परिसरातील प्रधान पार्क भागात डॉ हिरालाल खंडेलवाल आणि त्यांची पत्नी विजया खंडेलवाल राहतात. दरोडेखोरांनी खंडेलवाल दाम्पत्याच्या घरात प्रवेश करुन त्यांचे हात-पाय बांधले आणि सशस्त्र दरोडा टाकला होता. आरोपी मुंबईतील फिल्मसिटीमध्ये काम करणारे मजूर असल्याचं समोर आलं होतं. त्यांच्याकडून तीस लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला होता.

संबंधित बातम्या :

दुकानासमोर भिकारी बनून रेकी, नंतर दरोडा, देशभरात धुमाकूळ माजवणारी टोळी नालासोपाऱ्यात जेरबंद

CCTV VIDEO | लोणवळ्यात डॉक्टरांच्या घरात सशस्त्र दरोडा, दाम्पत्याला बांधून 66 लाखांची लूट

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.