AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | मनसेला रामराम, कुख्यात गुंड गजानन मारणेच्या बायकोचा राष्ट्रवादीत प्रवेश

मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री गजानन मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2012 साली त्या मनसेतून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. 2017 मध्येही त्यांनी महापालिका निवडणूक लढवली होती, मात्र तेव्हा त्या पराभूत झाल्या.

VIDEO | मनसेला रामराम, कुख्यात गुंड गजानन मारणेच्या बायकोचा राष्ट्रवादीत प्रवेश
गजानन मारणेच्या पत्नीचा राष्ट्रवादीत प्रवेश
| Edited By: | Updated on: Feb 17, 2022 | 6:36 AM
Share

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS Pune) पुण्यात गळती लागल्याचं चित्र आहे. मनसेतून बाहेर पडणारा रस्ता थेट राष्ट्रवादीकडे जातो की काय, असाच प्रश्न पडत आहे. कारण रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Patil) यांच्या पाठोपाठ मनसेतून आणखी एका महिला पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीची वाट धरली आहे. मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री मारणे (Jayashree Gajanan Marane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जयश्री मारणे या पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड गजानन मारणे याची पत्नी आहेत. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि रुपाली पाटील यांच्या नेतृत्वात जयश्री यांनी पक्ष प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आपण राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरल्याची प्रतिक्रिया मारणेंनी पक्षप्रवेशावेळी दिली.

कोण आहेत जयश्री मारणे?

मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री गजानन मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2012 साली त्या मनसेतून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. 2017 मध्येही त्यांनी महापालिका निवडणूक लढवली होती, मात्र तेव्हा त्या पराभूत झाल्या. जयश्री मारणे या पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड गजानन मारणे याची पत्नी आहेत.

निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी

येत्या महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा मानस जयश्री मारणे यांनी व्यक्त केला. पक्ष नेतृत्व संधी देईल, असा विश्वास मारणेंनी व्यक्त केला. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंच्या विचारांनी प्रभावित होऊन मी पक्षात आले, असं जयश्री मारणे यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि रुपाली पाटील यांच्या नेतृत्वात जयश्री यांनी पक्ष प्रवेश केला.

कोण आहे गजा मारणे?

गजा उर्फ गजानन मारणे हे पुण्यातील कुख्यात मारणे टोळीचा म्होरक्या. कोथरुडसह पुण्यात त्याची दहशत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात त्याच्याविरोधात 24 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

2014 पासून तुरुंगात, सात वर्षांनी सुटका

गुंड गजाजन मारणे याच्यावर 2014 मधील दोन हत्या प्रकरणात कारवाई करण्यात आली होती. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणी गजा मारणे आणि समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. गजाला 2014 पासून पुण्यातील येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. तब्बल सात वर्षांनंतर गजाची सुटका झाली.

गजा मारणेची तीनशे गाड्यांसह मिरवणूक

तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर गजा मारणेची मिरवणूक काढण्यात आली होती. त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले. गजा बसलेल्या गाडीची किंमत तब्बल दोन कोटी रुपये होती. मिरवणुकीत असलेली लँडक्रझर गाडी पुण्यातील काही मोजक्याच लोकांकडे आहे. गजा मारणेची या गाडीतून मिरवणूक निघाल्यामुळे त्याची चांगलीच चर्चा झाली होती.

जयश्री मारणेंचा पक्षप्रवेश, पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या :

रुपाली पाटील यांचा मनसेला अखेर ‘जय महाराष्ट्र’! अजित पवारांच्या उपस्थितीत हाती घड्याळ बांधणार

गजा मारणेच्या अडचणीत वाढ, पिंपरी चिंचवड पोलीस मोक्का लावणार

गजा मारणेची मिरवणूक काढणाऱ्या आठ जणांना अटक; भाजप पदाधिकाऱ्याचा समावेश

मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.