Pune | मित्रांसोबत पोहायला गेला, पण परतलाच नाही; पुण्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
मित्रांसोबत जलतरण तलावात पोहायला गेलेल्या अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू झाला. गणेश पुंडलिक पाटोळे (वय 17 वर्ष, रा. गल्ली क्रमांक 7, सरवदे वस्ती मागे. साठे नगर, महमदवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे.
पुणे : मित्रांसोबत पोहायला गेलेल्या एका अल्पवयीन मुलाचा (Minor Boy) पाण्यात बुडून मृत्यू झाला. पुणे (Pune) महापालिकेच्या जलतरण तलावाच्या पाण्यात बुडून (Drown in Swimming Pool) त्याला प्राण गमवावे लागले. रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. पुण्यातील वानवडी परिसरातील बापूसाहेब केदारी जलतरण तलावामध्ये हा प्रकार घडला. गणेश पुंडलिक पाटोळे असं मयत तरुणाचं नाव आहे. या घटनेमुळे मुलाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
मित्रांसोबत जलतरण तलावात पोहायला गेलेल्या अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू झाला. गणेश पुंडलिक पाटोळे (वय 17 वर्ष, रा. गल्ली क्रमांक 7, सरवदे वस्ती मागे. साठे नगर, महमदवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे.
तिघे मित्र स्विमिंग पूलमध्ये बुडाले
गणेश व त्याचे मित्र रेहान, अजय असे तिघे जण रविवारी दुपारी वानवडीतील शिवरकर मार्गावर असलेल्या पुणे महापालिकेच्या भाऊसाहेब केदारी जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाण्यात बुडून त्याला प्राण गमवावे लागले.
तरणांबाड लेक अकस्मात मृत्युमुखी पडल्यामुळे मुलाच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
संबंधित बातम्या :
किस्सा नहीं, कहानी बन गई; शेततळ्यांवरील व्हिडीओसाठी फेमस, अमरावतीच्या जोडगोळीचा बुडून मृत्यू
नाल्यात पोहताना दोन विद्यार्थी बुडाले, मित्र पळून गेले, रात्री मृतदेह सापडले
काळही आला, वेळही आली, मधमाशांच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी कालव्यात उडी, तरुणाचा बुडून मृत्यू