मनोहरमामा उर्फ मनोहर भोसलेसह तिघांवर बारामतीत गुन्हा दाखल, संत बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत केली फसवणूक
विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करत वडिलांच्या व फिर्यादीच्या जिविताची भिती घालून फिर्यादीकडून वेळोवेळी 2 लाख 51 हजार रुपये घेत फसवणूक केली. पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
बारामती : संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्यासह त्याच्या दोन अन्य साथीदारांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा देत आरोपींनी लोकांची फसवणूक केली. याप्रकरणी तिघांवर फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे यांचाही गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. (Manohar Mama alias Manohar Bhosale and three others were booked in Baramati)
कर्करोग बरा असे सांगून फिर्यादीकडून अडीच लाख उकळले
शशिकांत सुभाष खरात (रा. साठेनगर, कसबा, बारामती) या 23 वर्षीय तरुणाने याबाबत फिर्याद दिली आहे. 20 ऑगस्ट 2018 ते 31 ऑगस्ट 2021 या दरम्यान हा गुन्हा घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मनोहर भोसले याने बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत फिर्यादीच्या वडिलांच्या गळ्यातील थायराईड कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला. विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करत वडिलांच्या व फिर्यादीच्या जिविताची भिती घालून फिर्यादीकडून वेळोवेळी 2 लाख 51 हजार रुपये घेत फसवणूक केली. पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान मनोहर भोसले विरोधात आलेल्या तक्रारींची गंभीर दखल पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी घेतली आहे. फसवणूक प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अटक करण्याची तजबीज सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याआधीही मनोहर मामांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल
बारामती तालुक्यातील महेश आटोळे यांनी मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले यांनी अंधश्रद्धेतून फसवणूक झाल्याची तक्रार 31 ऑगस्ट 2021 रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे की, माझ्याकडून त्यांनी जवळपास 40 लाख रुपयाचा रो हाऊस घेतला होता. मात्र माझी कुठलीच कामे मार्गी लागली नाहीत. त्यामुळे मी दिलेला रो हाऊस मनोहर मामा यांना परत मागितला. मात्र रो हाऊस मी तुला देणार नाही, कारण तुझ्या तंत्रविद्या करण्यात माझे लाखो रुपये खर्च झाले आहेत. तू मला ते पैसे परत कर त्यावेळेसच मी रो हाऊस परत करेन, असं मनोहर मामा यांनी सांगितले. यामुळे आटोळे यांनी फसवणूक झाल्याची तक्रार बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल केली होती. (Manohar Mama alias Manohar Bhosale and three others were booked in Baramati)
Video | सरकारी शाळेतील मास्तरांचा धडाकेबाज डान्स, म्हणतात ‘दिल बडा बेईमान’https://t.co/Q4jWQOJshD#viral | #ViralVideo| #SocialMedia | #Teachers
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 9, 2021
इतर बातम्या
Dr. BAMU विद्यापीठाच्या पीआरओचा प्रताप, विद्यार्थिनीशी अश्लिल चॅटिंगचा आरोप, विनयभंगाचा गुन्हा दाखल