VIDEO : विवस्त्र होऊन दगडफेक, गाड्या अडवल्या, रुग्णवाहिकेचा ताबा घेतला, पुण्यात माथेफिरुचा धिंगाणा

पुण्याच्या दांडेकर पुलावर नीलायम जवळ एका मनोरुग्णाने धिंगाणा घातला. या मनोरुग्णाने एका रुग्णवाहिकेचा ताबा घेतला होता. त्यामुळे या मनोरुग्णाला पकडताना पोलिसांची मोठी कसरत झाली.

VIDEO : विवस्त्र होऊन दगडफेक, गाड्या अडवल्या, रुग्णवाहिकेचा ताबा घेतला, पुण्यात माथेफिरुचा धिंगाणा
विवस्त्र होऊन दगडफेक, गाड्या अडवल्या, रुग्णवाहिकेचा ताबा घेतला, पुण्यात माथेफिरुचा धिंगाणा
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 6:54 PM

पुणे : पुण्यात काही दिवसांपूर्वी एका मद्यधुंद तरुणीचा रस्त्यावर धिंगाणा करण्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर आता पुन्हा तशीच एक घटना समोर आली आहे. पुण्याच्या दांडेकर पुलावर नीलायम जवळ एका मनोरुग्णाने धिंगाणा घातला. या मनोरुग्णाने एका रुग्णवाहिकेचा ताबा घेतला होता. त्यामुळे या मनोरुग्णाला पकडताना पोलिसांची मोठी कसरत झाली. अखेर पोलिसांनी मोठ्या शिताफीने मनोरुग्णाला पकडलं.

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ही आज (18 सप्टेंबर) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. नीलायम टॉकीजजवळ एक मनोरुग्ण रस्त्याने जाणाऱ्या गाड्या अडवत होता. त्या गाड्यांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होता. तसेच तो गाड्यांवर दगडफेकही करत होता. या माथेफिरुच्या अंगावर कपडेही नव्हते. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणारे नागरिक त्याला घाबरत होते. या दरम्यान काही वाहतूक पोलिसांना माथेफिरु विषयी माहिती मिळाली. पण तोपर्यंत उशिर झाला होता. माथेफिरुने एका रुग्णवाहिकेवर ताबा मिळवलेला होता.

अखेर मोठ्या कसरतीनंतर मनोरुग्ण पोलिसांच्या ताब्यात

मनोरुग्णाने रुग्णवाहिकेवर ताबा मिळवल्याने पोलिसांची मोठी कसरत झाली. पोलिसांनी त्याला पकडण्याचा आणि अडवण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. यावेळी तिथे असलेल्या तीन प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना मदत केली. अखेर मोठ्या कसरतीनंतर मनोरुग्ण पोलिसांच्या हाती लागला. जवळपास पाऊण तास या नाट्यमय घडामोडी घडत होत्या. अखेर मोठ्या मेहनतीनंतर माथेफिरु पोलिसांच्या हाती लागला. हा मनोरुग्ण पोलिसांच्या हाती लागला नसता तर मोठा अनर्थ घडला असता असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :

पुण्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा, टिळक रोडवर झोपून गाड्या अडवण्याचा प्रयत्न

गेल्या महिन्यात पुण्यात टिळक रोडवर देखील असाच काहिसा प्रकार समोर आला होता. मद्यधुंद तरुणीने पुण्यात भररस्त्यात धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला होता. गजबजलेल्या टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात तरुणीने अक्षरशः धिंगाणा घातला. रस्त्यावर झोपून तिने वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अद्याप तरुणीवर गुन्हा दाखल झालेला नाही. टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात तरुणीने घातलेल्या धिंगाण्याची सर्वत्र चर्चा रंगली.

धुळ्यात दीर-भावजयीचा दारु पिऊन धिंगाणा

मुंबई-आग्रा महामार्गावर धुळ्यात महिला आणि पुरुषाने दारु पिऊन धिंगाणा घातल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. विशेष म्हणजे चौकशीसाठी आलेल्या पोलिसाचीच कॉलर पकडून महिलेने त्यांना धक्काबुक्की केली. संबंधित महिला आणि पुरुष हे दीर-भावजय असल्याची माहिती नंतर समोर आली होती.

हेही वाचा :

VIDEO : महिला आणि पुरुषात जुंपली, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ-मारहाण, बीडमधील धक्कादायक घटना

VIDEO : अंगातलं भूत काढण्याच्या नावाखाली महिलेला अमानुष मारहाण, अखेर भोंदू बाबावर गुन्हा दाखल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.