Pune : चॉकलेटचं आमीष दाखवून 4 वर्षांच्या चिमुरडीचं पुण्यात अपहरण! अवघ्या काही तासांत पोलिसांकडून अपहरणाचा छडा

Pune girl kidnapping : चार वर्षांच्या मुलीला चॉकलेटचं आमीष दाखवलं आणि तिला बाहेर आणलं. त्यानंतर त्याने या मुलीला आईच्या हवाले केलं.

Pune : चॉकलेटचं आमीष दाखवून 4 वर्षांच्या चिमुरडीचं पुण्यात अपहरण! अवघ्या काही तासांत पोलिसांकडून अपहरणाचा छडा
सुटकेचा थरार...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 7:02 AM

पुणे : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad crime news) पोलिसांनी अवघ्या काही तासांत अपहरण (Kidnapping News in Maharashtra) केलेल्या एका चार वर्षांच्या मुलीची सुटका केली आहे. अवघ्या काही तासांच्या आत चिखलीतून या मुलीला पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोडवलंय. या अपहरणप्रकरणी एका 42 वर्षांच्या इसमासह त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी अटक (Pune crime news) केली आहे. जुन्नरमध्ये पोलिसांनी अटकेची कारवाई केली असून सध्या त्यांची चौकशी केली जाते आहे. शनिवारी दुपारी चार वर्षांच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. मुलगी कुठेच आढळून येत नसल्यानं नातलगांना शंका आली. त्यामुळे त्यांनी अखेर पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि त्यात या मुलीचं अपहरण झालं असल्याचं निष्पन्न झालं. अखेर पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अवघ्या काही तासांच्या आत मुलीची सुटका केली आहे. नेमक्या कोणत्या कारणासाठी या चार वर्षांच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं, याचा आता शोध घेतला जातोय.

का केलं अपहरण?

पिंपरी चिंचवड पोलिस अधिकारी अंकुश शिंदे यांनी या अपहरणाच्या प्रकरणी अधिक माहिती दिली आहे. या अपहरणामागे नेमका हेतू कोणता होता, याचा तपास पोलिसांकडून केला जातोय. दरम्यान, चार वर्षांच्या मुलीचं अपहरण झाल्याचं कळल्यानंतर पोलिसांनी लगेचच गंभीर पावलं उचलली, त्यामुळे या मुलीला सुखरुप पुन्हा तिच्या नातलगांकडे सुपूर्द करण्यात आलंय. शनिवारी दुपारी ही घटना घडली होती.

हे सुद्धा वाचा

कसं केलं अपहरण?

पिंपरी चिंचवडमधील क्राईम ब्रांच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी चिखलीत राहत होती. शेजारच्या घरात असलेल्या चार वर्षांच्या या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. शेजारी राहत असलेल्या महिलेची बहीण आणि तिचा मुलगा चिखलीत राहायला आले होते. त्यावेळी संशयित आरोपी असलेल्या महिलेच्या मुलानं या चार वर्षांच्या मुलीला चॉकलेटचं आमीष दाखवलं आणि तिला बाहेर आणलं. त्यानंतर त्याने या मुलीला आईच्या हवाले केलं. अखेर चार वर्षांच्या मुलीला आपल्या ताब्यात घेत संशयित आरोपी महिला जुन्नरला पळून आली.

पोलिसांची तत्परता

मुलीच्या पालकांनी शोध घेतला असता आजूबाजूला कुठेच मुलगी आढळून आली नाही. त्यामुळे त्यांना काळजी वाटू लागली होती. अखेर या मुलीच्या पालकांनी पोलिसांत मुलगी बेपत्ता असल्याबाबत तक्रार दिली. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक महिला मुलीला घेऊन जात असल्याचं पोलिसांना आढळलं. या महिलेचा शोध घेत पोलिसांनी अखेर जुन्नर गाठलं आणि महिलेला अटक केली. या महिलेसह तिच्या पतीलाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सध्या पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.