Accident CCTV : तब्बल 2 किलोमीटर भरधाव कंटेनरने कारला फरफटत नेलं! थरारक अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Pune accident News : पुणे-नगर हायवेवरील शिक्रापूर इथं हा अपघात घडला. या भीषण अपघातावेळी कारमध्ये एकूण चार प्रवासी होते. या भीषण अपघातातून दैव बलवत्तर म्हणून चारही प्रवासी अगदी थोडक्यात बचावले आहेत. कारमधील एकालाही कोणताही दुखापत झाली.

Accident CCTV : तब्बल 2 किलोमीटर भरधाव कंटेनरने कारला फरफटत नेलं! थरारक अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
थरारक अपघात...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 9:26 AM

पुणे : पुणे अहमदनगर महामार्गावर (Pune Ahmednagar Highway) एक भयंकर अपघात (Pune accident) घडला. एका भरधाव कंटेनरने कारला अक्षरशः फरफटवलं. तब्बल दोन किलोमीटर लांब भरधाव कंटेनर कारला फरफटत घेऊन गेला. या थरारक अपघाताचं काळजाचा ठोका चुकणणारं सीसीटीव्ही फुटेज (Accident CCTV Video) समोर आलंय. धक्कादायक म्हणजे ज्या कारला कंटेनरने फरफटत नेलं, त्या कारमध्ये चार प्रवासी होते. या कारमधील प्रवाशांनी डोळ्यासमोर मृत्यू अनुभवला. पण थोडक्यात हे सर्व प्रवासी बचावले.

हायवेच्या रस्त्यालगत लागलेल्या एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही थरारक घटना कैद झाली आहे. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये भरधाव कंटेरनसमोर कार अक्षरशः आडव्या रेषेत आल्याचं दिसून आलंय. हा अपघात इतका भीषण होता की, कारला कंटेरन जेव्हा फरफटत नेत होता, तेव्हा रस्त्यावर ठिणग्या उडत होत्या. यावरुन कंटेनरचा वेग किती प्रचंड असेल, याची कल्पना करता येऊ शकेल.

हे सुद्धा वाचा

पुणे-नगर हायवेवरील शिक्रापूर इथं हा अपघात घडला. या भीषण अपघातावेळी कारमध्ये एकूण चार प्रवासी होते. या भीषण अपघातातून दैव बलवत्तर म्हणून चारही प्रवासी अगदी थोडक्यात बचावले आहेत. कारमधील एकालाही कोणतीही दुखापत झाली. मात्र अपघातामुळे सगळ्यांची मोठी घाबरगुंडी उडाली होती. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय कारमधील चारही प्रवाशांना आला.

पाहा व्हिडीओ :

राज्यात भीषण अपघाताचं सत्र सुरुच आहेत. शनिवारी रात्री नंदुरबारमध्येही एक भीषण अपघात झाला होता. यात दोघा जणांचा मृत्यू झाला होता. तर नागपुरातही शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोघांनी जीव गमावला होता. नागपुरात एका भरधाव कारने दुचाकींना मागून जबर धडक दिली होती. यातही दोघा जणांचा मृत्यू झाला होता.

विनायक मेटे, सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर रस्ते अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. आता या अपघातामुळे पुन्हा एकदा अपघातांचा मुद्दा अधोरेखित झाला आहे. भरधाव वेगामुळे अपघात वाढले असल्याचं आकडेवारीतून समोर आलं होतं. त्यामुळे वाहन चालकांनी वेगावर आवर घालण्याची गरज आता पुन्हा एकदा निर्माण झालीय.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.