Pune News : हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलावर सर्व्हिस टॅक्स लावला, ग्राहकाने विचारणा केली, मग पुढे जे घडले ते भयंकर

Pune Crime News : पुणे शहरात हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. जेवणाच्या बिलात सर्विस टॅक्स लावला गेला. त्यासंदर्भात ग्राहकाने मॅनेजरला जाऊन विचारणा केली. मग पुढे जे घडले ते भयंकरच होते...

Pune News : हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलावर सर्व्हिस टॅक्स लावला, ग्राहकाने विचारणा केली, मग पुढे जे घडले ते भयंकर
Follow us
| Updated on: Aug 27, 2023 | 2:00 PM

अभिजित पोते, पुणे | 27 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात हॉटेलमध्ये जेवण्यास गेलेल्या एका ग्राहकासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. मित्रासह हॉटेलमध्ये गेलेल्या युवकाकडे जेवणानंतर बिल आले. त्यावर सर्व्हिस टॅक्स लावण्यात आल्याचे दिसले. मग त्याने यासंदर्भात हॉटेलच्या व्यवस्थापकाला विचारणा केली. त्याचा राग त्यांना आला. हॉटेल मॅनेजर आणि हॉटेलच्या वेटरने मिळून त्या तरुणावर हल्ला केला. या मारहाणीत तो तरुण जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकार

पुणे शहरातील ३८ वर्षीय व्यावसायिक हुजेफा अत्तरवाला एनआयबीएम रस्त्यावर असलेल्या स्पाइस फॅक्टरी या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मित्रही होते. जेवण झाल्यावर त्यांनी बिल मागवले. बिलाची एकूण रक्कम 2030 रुपये होती. या बिलात 176.50 रुपये सर्व्हिस टॅक्स लावला होता. त्यामुळे त्यांनी बिलिंग काऊंटला जाऊन हॉटेल मॅनेजरला विचारणा केली.

मग भांडण अन् हाणामारी

अत्तरवाला यांनी सर्विस टॅक्ससोबत विचारणा केल्यावर हॉटेल मॅनेजरला राग आला. त्यांनी अपमानास्पद शब्दांत त्यांना बोलण्यास सुरुवात केली. त्यांच्यातील शाब्दीक हल्ले वाढत राहिले. पुढे त्याचे रुपातंर हाणामारीत झाले. काचेच्या भांड्याने आणि बिअरच्या बाटलीने त्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत अत्तरवाला यांना चांगलाच मार लागला. या प्रकरणी हॉटेल मॅनेजर जम्मेकर सामल, वेटर मौसम कुंवर याच्यासह 3 इतर वेटरवर कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मित्रही झाले जखमी

अत्तरवाल यांच्यासोबत आलेले त्यांचे मित्र अनिकेत परदेशी आणि राम त्यागी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी यांच्या डोक्यावर जड वस्तूने वार करण्यात आला, तर राम त्यागी यांच्या डोक्याला आणि उजव्या हाताच्या बोटाला धारदार शस्त्राने जखमा केल्या गेल्या. जखमी झालेले अत्तरवाल यांनी ससून रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. मात्र, यावेळी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.