भावकीत तलवारीचा घाव! ग्रामदैवतेच्या हिशोबाचा वाद, चुलत भावाचा तलवारीने भावावरच जीवघेणा हल्ला

पुण्यातील आंबेगाव तालुक्यात गावडेवाडीत दोघा भावात वाद झाला. निलेश गावडे आणि अक्षय गावडे अशी चुलत भावंडांची नावं आहेत. अक्षयने निलेशवर तलवारीनं वार करत हल्ला केला.

भावकीत तलवारीचा घाव! ग्रामदैवतेच्या हिशोबाचा वाद, चुलत भावाचा तलवारीने भावावरच जीवघेणा हल्ला
मंचर पोलिसात गुन्हा दाखलImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 10:37 AM

पुणे : ग्रामदैवतेच्या हिशोबावरुन वाद होण्याचे प्रकार अनेकदा पाहाण्यात आलेले आहेत. मात्र त्यावरुन जीवघेणा हल्ला (Attempt to murder) होण्याचा प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. पुण्यात (Pune crime) घडलेल्या या धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे. पुण्यामध्ये भावानंच भावावर जीवघेणा हल्ला केला. तलवारीनं वार करत जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात एक जण गंभीर जखमी झालाय. सध्या जखमी भावावर उपचार सुरु आहे. याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून अदिक तपास केला जातो आहे. आंबेगाव तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव (Ambegaon) तालुक्यात असलेल्या गावडेवाडी इथल्या ग्रामदैवतेच्या हिशोबावरुन वाद झाला. हा वाद टोकाला गेला. आपला चुलत भाऊ गामदैवतेच्या पैशांचा हिशोब न देता, त्याच पैशातून चित्रपट बघायला गेल्याचा राग दुसऱ्या भावाला आला. या रागातून चुलत भावानं जीवघेणा हल्ला केला. तलवारीनं वार करत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात भावाला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आता अधिक तपास केला जातो आहे.

अक्षय-निलेशचा वाद

पुण्यातील आंबेगाव तालुक्यात गावडेवाडीत दोघा भावात वाद झाला. निलेश गावडे आणि अक्षय गावडे अशी चुलत भावंडांची नावं आहेत. अक्षयने निलेशवर तलवारीनं वार करत हल्ला केला. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप निलेशकडून करण्यात आला. तलावारीच्या हल्ल्यामध्ये निलेश गंभीर जखमी झाला.

ग्रामदैवतेच्या पैशातून सिनेमा पाहिला?

गावडेवाडीतील निलेश गावडे हा सिनेमा पाहायला गेला होता. ग्रामदैवतेच्या पैशांचा गैरवापर करत निलेश सिनेमा पाहायला गेला, असा संशय अक्षय गावडेला होता. यातूनच त्यांच्यात वाद झाला. भावकीतच झालेल्या या वादानं सगळ्यांना धक्का बसला. अक्षय थेट तलवारीनं हल्ला केल्यामुळे सगळेच हादरुन गेले होते. दरम्यान, आता याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंचर पोलिसांनी तक्रारीवरुन हल्ला करणाऱ्या अक्षय गावडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

हे सुद्धा वाचा

ग्रामदैवतेच्या हिशोबावरुन वाद होण्याचे प्रकार अनेकदा पाहाण्यात आलेले आहेत. मात्र त्यावरुन जीवघेणा हल्ला होण्याचा प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. पुण्यात घडलेल्या या धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.