Pune drowned : पोहण्यात पटाईत, पण दम लागला आणि तलाठी बुडाला! तब्बल 6 तासांनंतर मृतदेह अखेर सापडला
चिरके पोहण्यात सराईत होते, मात्र पोहताना त्यांना दम लागला आणि अचानक नाका तोंडात पाणी जाऊन ते तलावात बुडाले.
पुणे : पोहण्यात पटाईत असलेल्या तरुण तलाठ्याचा बुडून मृत्यू (Pune Drowned Death) झाला. या तरुणाचा मृतदेह अखेर हाती लागलाय. पुणे सातारा (Pune-Satara Highway) महामार्गालत असलेल्या भोर तालुक्यातील वरवे गावातील तलावात पस्तीस वर्षांच्या तरुण तलाठ्याचा पोहताना बुडून मृत्यू झाला होता. आपल्या मित्रांसोबत हा तरुण सोमवारी सकाळी पोहण्यालाठी गेलेला होता. पोहोण्यात सराईत असलेल्या या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याचं कळल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला होता. दरम्यान, सोमवारी या तरुणाचा मृतदेह शोधण्याचं काम केलं जात होतं. अखेर या तरुणाचा मृतदेह (Dead body) शोधण्यात यश आलंय. भोर मधल्याच भोईराज जल आपत्ती पथकाला तब्बल सहा तासांच्या प्रयत्नांनंतर या तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश आलं. त्यानंतर हा मृतदेह या तरुणाच्या कुटुंबीयांच्या हवाले करण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला होता.
नुकतीच बदली झालेली…
मित्रांसोबत तलावात पोहायला गेले गेले असताना तलाठी मुकुंद चिरके हे बुडाले होते. मृतदेह पाण्याबाहेर काढताच घटनास्थळी असलेल्या नातेवाईकांच्या आक्रोशाने उपस्थितांची मनं हेलावून गेली होती. पस्तीस वर्षीय मुकुंद त्रिंबकराव चिरके सहा महिन्यापूर्वी वेल्हा तलाठी म्हणून येथे कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची बदली भोर येथे झाली होती. सोमवारी सकाळी सात वाजता चिरके हे चार मित्रांसोबत वरवे येथे पोहण्यासाठी गेले होते. पोहताना त्यांना दम लागून ते पाण्यात बुडाले.
पोहोण्यात सराईत, पण…
चिरके पोहण्यात सराईत होते, मात्र पोहताना त्यांना दम लागला आणि अचानक नाका तोंडात पाणी जाऊन ते तलावात बुडाले. बुडताना मदतीसाठी त्यांनी धडपडही केली. त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी आणि स्थानिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्यांला यश आलं नाही. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच तातडीनं प्रांतधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, मंडल अधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दुःखाचा डोंगर कोसळला
मुकुंद चिरके हे मित्रांसोबत रोज ट्रेकिंगसाठी आणि पोहण्यासाठी जात. सोमवारी ते त्यांच्या तीन मित्रांसोबत पोहत असताना चिरके तलावाच्या मध्यभागी असताना त्यांना दम लागला आणि ते बुडाले. भोरच्या भोईराज जल आपत्ती पथकाने तातडीने शोधकार्य सुरू केलं. सहा तासांनी त्यांना मृतदेह शोधण्यात यश आलं. वयाच्या पस्तीशीत घरातील मुलगा गमावल्यानं चिरके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.