VIDEO | इमारतीतील रहिवाशाला मारहाण, पुण्यात भाजप नगरसेविकेच्या पती आणि भावाचा व्हिडीओ व्हायरल

भाजप नगरसेविका अर्चना मुसळे यांचे पती आणि भावाने त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या एका नागरिकाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे शहरातील औंध परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे

VIDEO | इमारतीतील रहिवाशाला मारहाण, पुण्यात भाजप नगरसेविकेच्या पती आणि भावाचा व्हिडीओ व्हायरल
भाजप नगरसेविकेच्या पती-भावावर माराहणीचा आरोप
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 1:42 PM

पुणे : भाजप नगरसेविकेच्या पती आणि भावाने त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या रहिवाशाला मारहाण केल्याचा आरोप आहे. पुणे शहरातील औंध परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. औंधच्या भाजप नगरसेविका अर्चना मुसळे (Archana Musale) यांचे पती मधुकर मुसळे आणि भावावर मारहाणीचा आरोप आहे. (Pune BJP Corporator Archana Musale Husband Brother beaten up neighbor video viral)

नेमकं काय घडलं?

भाजप नगरसेविका अर्चना मुसळे यांचे पती आणि भावाने त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या एका नागरिकाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुसळे या औंध परिसरातील क्लोरियन पार्क या इमारतीत वास्तव्यास आहेत. मारहाण झालेली व्यक्तीही याच इमारतीत राहत असल्याची माहिती आहे.

काय आहे व्हिडीओ?

“सोसायटीत आपली बदनामी करणारी पत्र का वाटली? त्यावर तुझीच सही आहे ना?” असा जाब मुसळे विचारत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओ मारहाणीसोबतच शिवीगाळ झाल्याचंही ऐकू येत आहे. तर “मला यासंबंधी काहीही बोलायचं नाही. सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये मी सांगेन” असं संबंधित रहिवासी बोलताना ऐकू येतं.

पोलिसात परस्परविरोधी तक्रार

दरम्यान, याबाबत पुण्यातील चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

शिवसेनेत अंतर्गत राडा

दुसरीकडे, अहमदनगर महापौरपदाच्या निवडणुकीच्या आदल्या रात्रीच शिवसेनेच्या दोन गटात राडा पाहायला मिळाला होता. महापौर निवडीवरुन अहमदनगरमधील शिवसेना नगरसेवकांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास वादावादी झाली. यावेळी शिवसेना नगरसेविकेचे पती निलेश भाकरे यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO | अहमदनगर महापौरपदाच्या निवडणुकीआधी शिवसेनेच्या दोन गटात राडा

नवी मुंबईतील नगरसेविकेचे पती संदीप म्हात्रेंवर गुन्हा, हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना मारहाणीचा आरोप

(Pune BJP Corporator Archana Musle Husband Brother beaten up neighbor video viral)

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.