Pune Crime : अघोरी पूजा करत पत्नीला करायला लावली सर्वांसमक्ष अंघोळ! पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे जिल्ह्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली. एका बिझनेसमनने व्यवसायात भरभराट व्हावी, घरात सुख शांती नांदावी, यासाठी मांत्रिकाची मदत घेतली. इतकंच काय तर पुत्रप्राप्तीसाठीही त्याने मांत्रिकाची मदत घेत त्याला अघोरी पूजा करण्यास सांगितलं होतं.

Pune Crime : अघोरी पूजा करत पत्नीला करायला लावली सर्वांसमक्ष अंघोळ! पुण्यातील धक्कादायक प्रकार
धक्कादायक प्रकार...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 11:51 AM

पुणे : सुसंस्कृत अशी ओळख असलेल्या पुण्यातील (Pune crime news) एक धक्कादायक घटना समोर आली आली आहे. एका पत्नीला सगळ्यांसमोर अंघोळ करण्यास पतीनेच भाग पाडल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी आता गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. व्यवसायात भरभराट व्हावी, घरात सुख शांती नांदण्यासोबत पुत्रप्राप्ती व्हावी, यासाठी पतीने हे माथेफिरु पाऊल उचललंय. एका मांत्रिकाच्या सांगण्यावरुन पतीने केलेल्याय या कृत्याप्रकरणी अखेर पोलिसांत तक्रार दाखळ करण्यात आली असून गुन्हा नोंदवण्यात आलाय. भारती विद्यापीठ पोलीस (Bharati Vidyapeeth Police) याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. विशेष म्हणजे हे कृत्य करायला लावणारा पती हा पुण्यात बिझनेसमन (Pune Businessmen) म्हणून ओळखला जातो. पत्नीसोबत अघोरी पूजा करणाऱ्या या पतीविरोधात आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचंय. सध्या याप्रकरमी पुढील तपास केला जातोय.

संतापजनक कृत्य

पुणे जिल्ह्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली. एका बिझनेसमनने व्यवसायात भरभराट व्हावी, घरात सुख शांती नांदावी, यासाठी मांत्रिकाची मदत घेतली. इतकंच काय तर पुत्रप्राप्तीसाठीही त्याने मांत्रिकाची मदत घेत त्याला अघोरी पूजा करण्यास सांगितलं होतं. मांत्रिकांच ऐकून या बिझनेसमनने आपल्या पत्नीलाही पुजेत सामील करुन घेतलं.

मांत्रिकांमुळे अघोरी पूजा

संतापजनक बाब म्हणजे यावेळी पूजेच्या नावाने या पतीने सर्वांच्या देखत आपल्या पत्नीला अंघोळ करण्यास भाग पाडलं. या संतापजनक प्रकाराची पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानंतर अखेर भारती पोलिसांनी आरोपी पतीसह पीडित महिलेच्या सासू सासऱ्यांसह मांत्रिकावरही गुन्हा दाखल करुन घेतला आहे. भारती विद्यापीठ पोलीस सध्या या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

तक्रारदार महिलेनं केलेल्या आरोपात खळबळजनक आरोप केला आहे. आपल्यावर भानामती असून ती नाहीतशी व्हावी यासाठी मला सर्वांसमोर अंघोळ करण्यास लावली, असं पीडितेनं तक्रारीत म्हटलंय. तसंच माझ्याकडून एक ते दोन कोटी रुपये घेतल्याचाही आरोप केला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला असून संशयित आरोपींची चौकशी करुन पुढील कारवाई केली जाईल. याप्रकऱणी आता नेमकी काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचंय. मात्र ही घटना उघडकीस आल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला जातोय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.