ब्लाऊजने गळा आवळून सासूची हत्या, पोत्यात भरुन मृतदेह झुडपात फेकला, पिंपरीत मुलगा-सूनेला अटक

सासू बेबी शिंदे यांचा मृतदेह झुडपात टाकत असताना सून परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली (Murder Mother in Law Blouse)

ब्लाऊजने गळा आवळून सासूची हत्या, पोत्यात भरुन मृतदेह झुडपात फेकला, पिंपरीत मुलगा-सूनेला अटक
सासूचा मृतदेह झुडपात टाकताना सून सीसीटीव्हीत कैद
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 9:06 AM

पिंपरी चिंचवड : घरगुती वादातून सुनेने सासूची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. हत्येनंतर सासूचा मृतदेह पोत्यात भरुन सूनेने झुडपात फेकला होता. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी मुलगा-सूनेला अटक केली आहे. हत्येच्या घटनेमुळे पिंपरी चिंचवड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बेबी गौतम शिंदे असे हत्या झालेल्या सासूचे नाव आहे. (Pune Crime News Pimpri Chinchwad Murder Daughter in Law killed Mother in Law with Blouse)

ब्लाऊजच्या सहाय्याने गळा आवळून खून

आरोपी पूजा मिलिंद शिंदे हिचे सासू बेबी गौतम शिंदे सोबत किरकोळ घरगुती कारणांवरुन वाद सुरु होते. त्याचाच राग मनात धरुन पूजा हिने तीन दिवसांपूर्वी ब्लाऊजच्या सहाय्याने गळा आवळून सासूचा खून केला होता. हत्येनंतर सासूचा मृतदेह तिने पोत्यात लपवला.

सूनेकडून हत्या, मुलाने पुरावे नष्ट केले

पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह भरलेलं पोतं तिने आधी टेरेसवर ठेवलं होतं. त्यानंतर सोसायटीतील राजेंद्र भांगरे यांच्या बंगल्याशेजारील प्लॉटमधील झुडपात नेऊन तिने पोतं टाकून दिलं. मृतदेह टाकून आल्यानंतर टेरेस आणि सोसायटीच्या पायऱ्यांवर पडलेलं रक्त आरोपी मुलगा मिलिंद शिंदे याने धुवून-पुसून पुरावा नष्ट केला. (Murder Mother in Law Blouse)

शेजाऱ्यांच्या जागरुकतेमुळे हत्येला वाचा

मृतदेह टाकत असताना स्थानिक तरुणांनी पूजाला पाहिलं. शंका आल्यामुळे त्यांनी पोलिसांशी संपर्क केला असता ही घटना उघडकीस आली. सासू बेबी शिंदे यांचा मृतदेह झुडपात टाकत असताना जवळ असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली. पूजा मिलिंद शिंदे आणि मिलिंद गौतम शिंदे असे या प्रकरणातील आरोपी सून आणि मुलाचे नाव आहे. दोघांनाही पुण्यातील तळेगांव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

एकमेकांवर प्रेम जडलं, आयुष्यभर सोबतीचा निश्चय, कुटुंबियांनी लग्नाला विरोध करताच प्रेमी युगुलाचं टोकाचं पाऊल

VIDEO | औरंगाबादेत शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण, पुरुषांसह महिलांनाही चोप

(Pune Crime News Pimpri Chinchwad Murder Daughter in Law killed Mother in Law with Blouse)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.