Pune Crime VIDEO: आई-बापाने कोंडलं…22 कुत्र्यांसोबत 730 दिवस, 11 वर्षांच्या मुलाचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ…
गेल्या दोन वर्षांपासून रस्त्यावरची कुत्रे घरात आणून पाळली जायची आणि मुलालाही त्याच रुममध्ये कोंडण्यात आलं होतं अशी माहिती आता पोलिसांच्या हाती लागली आहे. एका सामाजिक संघटनेच्या कार्यकर्तीनं तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. तो व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील.
पुणे : आई वडिलांकडे नेहीमीच जगातला कधीही न आटणारा मायेचा झरा म्हणून पाहिलं जातं. मुलं आपल्या आई वडिलांना (Mother Father) देवाचा दर्जा देतात. मात्र पुण्यात घडलेला एक प्रकार हा नात्याला काळीमा फासणारा आहे. कारण आई-वडिलांनी पोटच्या लेकराला 2 वर्ष घरातचं डांबून (Child Abuse) ठेवलं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ माजली आहे. तब्बल 22 कुत्र्यांसोबत (Dogs) राहिल्याने या मुलाची वर्तणूक बिघडली असून याचा मुलाच्या मनावर परिणाम झाल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या दोन वर्षांपासून रस्त्यावरची कुत्रे घरात आणून पाळली जायची आणि मुलालाही त्याच रुममध्ये कोंडण्यात आलं होतं अशी माहिती आता पोलिसांच्या हाती लागली आहे. एका सामाजिक संघटनेच्या कार्यकर्तीनं तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. तो व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील.
व्हिडिओ अंगावर काटा आणणार
या व्हिडिओत एक व्यक्ती हातात मोबाईल घेऊन घरात शिरताना दिसत आहे. घरात शिरताच कुत्र्यांची टोळी त्याच्यासमोर कॅमेऱ्यात दिसत आहे. या कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकूण कुणाच्याही अंगावर काटा फुटेल असा भयानक हा आवाज आहे. त्यानंतर ही कुत्री त्या व्यक्तीच्या अंगावर जाताना दिसत आहे. या व्हिडिओत एका महिलेचा आवजही येत आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद करणारी व्यक्ती या महिलेला बाथरुमची लाईट लावण्यास सांगते. मात्र काही वेळातच ही महिला या व्यक्तीला मोबाईलमधील शुटिंग बद करायला सांगत आहे. त्यानंतर ही व्यक्ती संपूर्ण घर फिरून कॅमेऱ्यात कैद करत आहे. त्यावेळी कुत्र्यांचं भुंकणे अजूनही सुरू असलेलं लक्षात येत. त्यानंतर ही व्यक्ती दुसऱ्या खोलीचा दरवाजा उघडताच समोर एक लहानगा पालथा झोपलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. त्यानंतर ही व्यक्ती पुन्हा घरातील इतर परिस्थिती दाखवत आहे.
मुलाला बालसुधारगृहात पाठवलं
या मुलाला कोंढवा पोलिसांनी बालसुधारगृहात पाठवलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कारण अत्यंत घाणीच्या, अस्वच्छतेच्या ठिकाणी तब्बल 22 कुत्र्यांसोबत हा 11 वर्षांचा लहान मुलगा अडकला होता, त्यामुळे सध्या त्याची तब्येत फारशी फीट नाही. तसेच प्राण्यांना आणि लहान मुलांना अशा अस्वच्छ स्थितीत ठेवणे हा गुन्हा आहे. मुलाच्या पालकांनी कुत्र्यांना घरात ठेवण्याची परवानगी घेतली होती का? याचा तपास पोलीस करत असून बालकल्याण समितीच्या निर्णयानंतर या जोडप्याला अटक केली जाणार आहे, अशी माहिती कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिली आहे. हा प्रकार पाहिल्यानंतर कुणाच्या काळजाचा थरकाप उडेल असा आहे.