Pune Honey Trap : प्रदीप कुरुलकर याच्या फाईली रिकव्हर करण्यास पुण्यातील लॅबला अपयश, आता हा पर्याय

Pune News Honey Trap : पुणे शहरातून उघड झालेले हनी ट्रॅप प्रकरणातील कोंडी अजूनही सुटत नाही. प्रदीप कुरुलकर याने त्याच्या मोबाईलमधील अनेक डेटा डिलीट केला आहे. तो रिकव्हर करण्यास यश आलेले नाही.

Pune Honey Trap : प्रदीप कुरुलकर याच्या फाईली रिकव्हर करण्यास पुण्यातील लॅबला अपयश, आता  हा पर्याय
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 2:27 PM

अभिजित पोते, पुणे | 18 ऑगस्ट 2023 : पुणे येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) माजी संचालक प्रदीप कुरुलकर हेरगिरी प्रकरणात कारागृहात आहेत. पाकिस्तानी लैलाच्या हनी ट्रॅपमध्ये प्रदीप कुरुलकर अडकले होते. त्यानंतर त्यांनी देशातील संरक्षणासंदर्भातील महत्वाची माहिती त्या महिलेस शेअर केली. हे प्रकरण उघड झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मोबाईलमधील फाईल डिलीट केल्या. या डिलिट केलेल्या फाईली रिकव्हर करण्यात पुणे शहरातील फॉरेन्सिक लॅबला अपयश आले आहे.

काय असणार पर्याय

प्रदीप कुरुलकर तसास संस्थांना चौकशीला सहकार्य करत नाही. यामुळे त्याच्याकडून जप्त केलेला मोबाईल महत्वाचा पुरावा आहे. परंतु या मोबाईलमधील डेटा त्यांनी डिलिट केला आहे. या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न पुणे फॉरेन्सिक लॅबमध्ये करण्यात आला. परंतु एकही फाइल्स ओपन नसल्याची माहिती एटीएसने शुक्रवारी कोर्टात दिली. यामुळे कुरुलकर यांचा वन प्लस फोन गुजरातच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासासाठी पाठवण्याची परवानगी एटीएसने कोर्टाकडे मागितली.

जामिनावर सुनावणी होणार

प्रदीप कुरुलकर यांनी जमीनसाठी अर्ज केला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर 25 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. त्याचवेळी कुरुलकर यांचा वन प्लस मोबाईल गुजरातच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्याबाबत कोर्ट निर्णय देणार आहे. यामुळे जमिनासह कुरुलकर प्रकरणातील अनेक मुद्द्यांवर 25 तारखेला सुनावणी होणार आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे प्रकरण

प्रदीप कुरुलकर हे ‘डीआरडीओ’चे माजी संचालक होते. त्यांच्याशी पाकिस्तानी गुप्तहेर महिला झारा दासगुप्ताने संपर्क केला होता. त्यानंतर त्यांनी स्वत:ची ओळख करुन दिली. मग दोघांचे चॅटींग वाढत गेले. त्यानंतर फोनवर बोलणे सुरु झाले. या दरम्यान कुरुलकर तिच्या जाळ्यात पूर्णपणे अडकले. तिला देशाच्या संरक्षणासंदर्भातील गोपनीय माहिती त्यांनी दिली. व्हॉटसॲप मेसेज, व्हिडिओ आणि व्हाइस कॉलद्वारे ही माहिती दिली.

डिआरडिओकडून निलंबन

हा प्रकरण उघड झाल्यानंतर एटीएसने प्रदीप कुरुलकर यांना मे महिन्यात अटक केली. तेव्हापासून ते पुणे शहरातील येरवडा कारागृहात आहे. डीओडीओकडूनही त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.