Pune Fire : पुण्यातल्या कोंढव्यात भीषण आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
आज पुन्हा पुण्यात मोठी आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीच्या घटनेची दाहकताही बरीच मोठी आहे. त्यामुळे पुन्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. ही भीषण आगीची घटना आता पुण्यातल्या कोंढवा परिसरात घडल्याने या परिसरातील नागरिक सध्या चिंतेत आहेत.
पुणे : पुण्यात (Pune) गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस आगीच्या (Pune Fire) घटना वाढत चालल्या आहेत. कधी रुग्णालयाला आग तर कधी रहिवाशी इमारतीला आग, अशा घटना वारंवार घडत असल्याने पुणेकरांची डोकेदुखी सध्या चांगलीच वाढली आहे. कधी कधी तर बाजारपेठेतल्या दुकानाला तर कधी कचरा डेपोत आग लागण्याच्या घटनाही घटत आहे. त्यामुळे या आगींवर कसे नियंत्रण मिळवावे याबाबत फायर ब्रिगेड (Fire Brigade) आणि महापालिका प्रशासन उपाययोजना आखत आहे. मात्र तरीही या आगीच्या घटना नियंत्रणात येताना दिसान येत नाहीत, कारण आज पुन्हा पुण्यात मोठी आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीच्या घटनेची दाहकताही बरीच मोठी आहे. त्यामुळे पुन्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. ही भीषण आगीची घटना आता पुण्यातल्या कोंढवा परिसरात घडल्याने या परिसरातील नागरिक सध्या चिंतेत आहेत.
पुण्यातल्या आगीचा व्हिडिओ
#WATCH | Maharashtra: A fire broke out in 5-6 godowns in the Parge Nagar area of Kondhwa, Pune. 10 fire engines present at the spot. More details awaited. pic.twitter.com/8ngBiIFhz1
— ANI (@ANI) April 26, 2022
अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू
आता जी आगीची घटना समोर आली आहे ती पुण्यातील कोंढवे भागातील पारगे नगर येथे येथे एका गोडाउनमधे आग लागल्याची आहे. ही आगीची घटना अत्यंत मोठी आहेत. म्हणूनच अग्निशमन दलाने ही आग विझवण्यासाठी तातडीने हलचाली सुरू केल्या आहेत अग्निशमन दलाचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. सध्या या ठिकाणी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्यापही ही आग नियंत्रणात आली नाही. त्यामुळे ही आग विझवताना अग्निशमन दलाचीही दमछाक होताना दिसून येत आहे. अग्निशमन दल आणखी जवानांना या ठिकाणी तैनात करण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाकडून 10 गाड्या या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत, तरीही अजून आगीवर नियंत्रण मिळवता आलेलं नाही.
प्रशासनाकडून कोणतीही माहिती नाही
या आगीमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये सध्या घबराटीचे वातावरण पसरले आहे. सध्या या परिसरात ही आग पाहण्यासाठीही मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. या आगीमुळे या परिसरात धुराचेही मोठे लोट पसरले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रदुषणाचाही सामना या परिसरातील नागरिकांना करावा लागत आहे. ही कधी नियंत्रणात येईल, किंवा या आगीत आतापर्यंत किती नुकसान झालं आहे, याबाबत अध्याप कोणतीही माहिती समोर आली नाही आणि अग्निशमन दल किंवा पोलिसांनीही याबाबत अजूनपर्यंत काहीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच पालिका प्रशासनानेही याबाबत काही अधिकृत माहिती दिली नाही. त्यामुळे ही कध नियंत्रणात येणार असा सवाल स्थानिकांकडून विचारण्यात येत आहे. तसेच याबाबत लवकरच प्रशासन आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे.