वाद वडिलांशी, पण वचपा काढला 4 वर्षांच्या मुलावर! थेट ट्रॅक्टरच अंगावर घातला आणि…

4 वर्षांच्या चिमुरड्याच्या अंगावर ट्रॅक्टर चढवला आणि घडला अनर्थ! इंदापुरातील खळबळजनक घटना

वाद वडिलांशी, पण वचपा काढला 4 वर्षांच्या मुलावर! थेट ट्रॅक्टरच अंगावर घातला आणि...
चार वर्षांच्या चिमुरड्याचा खूनImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 12:15 PM

पुणे : इंदापूर तालुक्यात एका चार वर्षांच्या मुलाची हत्या (Indapur Murder News) करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे या चार वर्षांच्या मुलाच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्यात आला आणि त्याचा खून करण्यात आला. या खळबळजनक हत्याकांडप्रकरणी आरोपीला अटक (Pune Crime News) करण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचं कळतंय. इंदापूर तालुक्यातील सरसेवाडी (Sarasewadi, Indapur) गावच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ माजलीय. अबुजर जब्बार शेख असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे.

जमीन व्यवहाराच्या भांडणातून हा प्रकार घडला. वडिलांसोबत असलेल्या भांडणाचा वचपा त्याच्या निष्पाप मुलावर काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सरसेवाडी गावच्या हद्दीमध्ये चार वर्षांच्या अबुजरच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्यात आला. यात अबुजरचा मृत्यू झाला.

इंदापरू पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हाचा गुन्हा दाखल करुन घेतला. तसंच आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या धक्कादायक प्रकाराचा खळबळजनक घटनाक्रमाचा खुलासाही केला आहे.

हे सुद्धा वाचा

पाहा लाईव्ह घडामोडी : Video

सरसेवाडी जाधव पाटी इथं राहणारे 36 वर्षीय जब्बार गफूर शेख यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीनुसार जयप्रकार नरहरी देवकाते याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

जयप्रकाश देवकाते याने जब्बार गफूर शेख यांच्या मुलगा अबुजर शेख (वय 4 वर्ष 2 महिने) याच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. या ट्रॅक्टरचा क्रमांक एमएच 12 एफ 1248 होता. आधीच असलेल्या जमीन व्यवहाराच्या भांडणातून जयप्रकाश याने आपल्या मुलाच्या अंगावर ट्रॅक्टर घातल्याचा आरोप जब्बार यांनी केलाय.

अबुजरच्या अंगावर ट्रॅक्टर घातल्यानं त्याला गंभीर जखम झाली होती. त्याच्या डोक्याला, तोंडाला आणि उजव्या कानाजवळ गंभीर मार बसला होता. गंभीर दुखापतींमुळे त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, ट्रॅक्टर मुलाच्या अंगावर घातल्यानंतर जयप्रकाश ट्रॅक्टर शेतातच सोडून पळून गेला होता.

इंदापूर पोलिसांनी आता आरोपीला अटक केली आहे. सध्या त्याची कसून तौकशी केली जाते आहे. अटक करण्यात आलेला आरोपी शिवाजी चौक खडकपुरा इथं सध्या राहायला आहे. तो मूळचा सरसेवाडी जाधव वस्तीतीलच असल्याचीही माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.