isis terrorist | दशतवादी शाहनवाज बॉम्ब बनवण्यात होता मास्टर, हिंदू मुलीशी लग्नअन्…

Nia pune isis module terrorist | पुणे पोलिसांच्या कस्टडीतून फरार झालेला इसिस मॉड्यूल प्रकरणातील दहशतवादी शाहनवाज याच्यावर एनआयएने तीन लाखांचे बक्षीस ठेवले होते. बॉम्ब बनवण्यात तो मास्टर होता. तसेच त्याने एका हिंदू मुलीशी लग्न केले...

isis terrorist  | दशतवादी शाहनवाज बॉम्ब बनवण्यात होता मास्टर, हिंदू मुलीशी लग्नअन्...
Follow us
| Updated on: Oct 03, 2023 | 4:21 PM

पुणे | 3 ऑक्टोंबर 2023 : एका मोटारसायकल चोरी प्रकरणाचा तपास करताना पुणे पोलिसांना दहशतवादी मिळाले. 18 जुलै रोजी पुणे पोलिसांनी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी या दोघे दहशतवाद्यांना पकडले. त्यावेळी शाहनवाज उर्फ शैफी उज्जमा (ISIS terrorist Shahnawaz) हा फरार झाला होता. त्याला रविवारी रात्री दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. मायनिंग इंजीनिअर असलेला शाहनवाज बॉम्ब बनवण्यात मास्टर होता.

बॉम्ब बनवण्यासाठी इंजीनिअरींगचे ज्ञान

शाहनवाज याच्या पुणे येथील ठिकाणावरुन आयईडी बनवण्याचे समान मिळाले. त्यामुळे तो बॉम्ब बनवण्यात मास्टर असल्याची माहिती समोर आली. त्याने इंजीनिअरींग मायनिंगमध्ये केले. त्यामुळे त्याला स्फोटाकांसंदर्भात बऱ्यापैकी माहिती होती. त्याच्या त्या इंजीनिअरींगमधील ज्ञानाचा वापर त्याने दहशतवादी कारवायांसाठी केला. तसेच इंटरनेटवरुन त्याने यासंदर्भात बरेच शिक्षण घेतले. त्याने बॉम्ब बनवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले. त्याने इतर लोकांसाठी बॉम्ब बनवण्याची कार्यशाळाही घेतली होती. सातारा, सांगली येथील जंगलात त्याने बॉम्बचा स्फोट केला होता.

पत्नी होती बसंती पटेल बनवले मरियन

शाहनवाज याने हिंदू असलेल्या बसंती पटेल हिच्याशी लग्न केले. लग्नानंतर तिने धर्म परिवर्तन केले. तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि ती मरियम झाली. दिल्ली पोलिसांनी शाहनवाज याला अटक केली तेव्हा त्याची पत्नी फरार झाली. तिचा शोध सुरु आहे. शाहनवाज हा झारखंडमधील हजारी बाग येथील रहिवाशी आहे.

हे सुद्धा वाचा

असा झाला खुलासा

पुणे पोलिसांनी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी यांना अटक केली होती. त्यावेळी ते भुरटे चोर असल्याचा पोलिसांचा समज होता. परंतु त्याच्या घराची तपासणी केल्यावर अनेक आक्षेपार्ह साहित्य मिळाले. त्यामुळे ते दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा त्या ठिकाणावरुन शाहनवाज फरार झाला होता. 18 जुलै नंतर आता 1 ऑगस्ट रोजी दिल्ली पोलिसांना मिळाला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.