Pune : सटॅक… ‘मारू नको अनुजा!’ आधी तिच्या गळ्यात चपलेचा हार आणि मग मारहाण, नेमकं तृतीयपंथींनी असं का केलं?

Pune crime news : एका 40 वर्षीय महिलेनं या संपूर्ण प्रकरणी तक्रार दाखल केली.

Pune : सटॅक... 'मारू नको अनुजा!' आधी तिच्या गळ्यात चपलेचा हार आणि मग मारहाण, नेमकं तृतीयपंथींनी असं का केलं?
धक्कादायक...Image Credit source: Twitter Video Grab
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 10:51 AM

पुणे : दोन व्हिडीओ (Viral Video) समोर आले असून या व्हिडीओमध्ये एका महिलेच्या गळ्यात चपलेचा हार टाकून तिला मारहाण करण्यात आली आहे. तसंच तिला धमकावण्यातही आलं. याबाबचे दोन व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झालेत. यामध्ये तृतीयपंथी (Transgender) महिलेकडून महिलेला धमकावलं जातं असल्याचं दिसून आलं आहे. याप्रकरणी अखेर पोलीस तक्रारही (Pune crime News) दाखल करण्यात आली. त्यानंतर नेमका हा सगळा प्रकार काय आहे, यावरुनही चर्चांना उधाण आलंय. 23 जून रोजी ही घटना घडली. एका 40 वर्षांच्या महिलेला तृतीयपंथींकडून मारहाण करण्यात आली होती. विश्रांतवाडी परिसरात ही घटना घडली. शिवलक्ष्मी नावाची एक तृतीयपंथी महिला व्हिडीओतून धमकावत असल्याचं दिसून आलंय. याप्रकरणी पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन घेतलाय. तर पुढील चौकशी सुरु आहे.

काय आहे नेमकी तक्रार?

बारामतीमधील एका 40 वर्षीय महिलेनं या संपूर्ण प्रकरणी तक्रार दाखल केली. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात ही तक्रार देण्यात आली. महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी शिवलक्ष्मी उर्फ सागर पोपट शिंदे आणि तिच्यासोबत असलेल्या तृतीयपंथी, महिला आणि पुरुषांवर गुन्हा दाखल केलाय.

ज्या महिलेला ही मारहाण करण्यात आली, ती महिला अपप्रवृतीतविरोधात जनजागृती करते, असं सांगितलं जातंय. या महिलेला मारहाण करुन त्याचा व्हिडीओ युट्युबवरही अपलोड करण्यात आला आणि तक्रारदार महिलेचा बदनामी करण्यात आली, अशी तक्रार पोलिसांत देण्यात आली.

हे सुद्धा वाचा

कशामुळे वाद?

युट्युबवर असलेल्या च‌ॅनेलवरील कंटेटवरुन हा सगळा वाद सुरु झाला. शिवलक्षी या स्वतः एक युट्युब चॅनेल चालवतात. त्यावर अंधश्रद्धा परवलणं, वयस्कर व्यक्तींना पाया पडायला लावणं अशा चुकीच्या गोष्टी केल्या जात असल्याचा आरोप तक्रारदार महिलेकडून करण्यात आलेला होता.शिवलक्ष्मी एक आखाडा महंत असून तिनेही स्वतः येवला शहर पोलीस ठाण्यात एप्रिल महिन्यात गुन्हा दाखल केला होता. लिंग आणि वर्णभेदी टिप्पणी केल्यासोबत दमदाटी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. दरम्यान, आता दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास केला जातो आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.