नेपाळी मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ‘थापा’ला अटक! ती ‘थापा’च्या नात्यातलीच…

ती नुकतीच नेपाळून लोणावळ्याला आली होती, थापावर विश्वास ठेवून त्याच्यासोबत बाजारात गेली, पण थापाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.

नेपाळी मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी 'थापा'ला अटक! ती 'थापा'च्या नात्यातलीच...
आरोपीला अटकImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 07, 2022 | 12:04 PM

रणजीत जाधव, TV9 मराठी, लोणावळा : एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Minor Girl Molested) केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक (Police Arrest) केली आहे. या आरोपीचं नाव शंकर पानसिंग बहाद्दूर थापा (Shankar Paansingh Bahadur Thapa) असं आहे. अत्याचार करण्यात आलेली पीडित मुलगी ही नेपाळून आली होती. विशेष म्हणजे नात्यातीलच मुलीवर आरोपी थापाने अत्याचार केल्याचंही समोर आलंय. आता अटक करण्यात आलेल्या आरोपीची कसून चौकशी केली जातेय. ही घटना उघडकीस आल्यानंतर लोणावळा परिसरात खळबळ माजलीय.

नुकताची नेपाळहून आली, पण…

नुकतीच 13 वर्षांची मुलगी आणि तिचा सात वर्षांचा भाऊ असे दोघे जण लोणावळ्यात आले होते. नेपाळहून लोणावळ्यात आपल्या नातेवाईकांच्या घरी ते पाहुणे म्हणून राहत होते. दरम्यान, विश्वासने ही मुलही आणि तिचा सात वर्षांचा भाऊ शंकर पानसिंग बहाद्दूर थापा याच्यासोबत बाजारात गेले होते. त्यावेळी शंकर याने अल्पवयीन नेपाळी मुलीसोबत संतापजनक कृत्य केलं.

बाजाराच्या बहाण्याचे गैरकृत्य

भाजीपाला खरेदीच्या बहाण्याने मुलीसोबत आलेल्या थापा याने तिच्यावर अतिप्रसंग केला. एका निर्जनस्थळी मुलीला नेऊन तिच्यावर थापा याने अत्याचार केला. या घटनेनं पीडितेच्या मनावर मोठा आघात झालाय.

हे सुद्धा वाचा

पाहा लाईव्ह घडामोडी : Video

थापाला अटक

भेदरलेल्या अवस्थेत 13 वर्षांच्या अल्पवयीने पीडितेने हिंमत करुन आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितलं. त्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांना थापाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. अखेर पोलिसांनीही या घटनेची गंभीर दखल घेत तातडीने संशयित आरोपी थापाविरोधात गुन्हा नोंदवून घेतला.

आता शंकर पानसिंग बहाद्दूर थापा याला अटकही करण्यात आलीय. लोणावळा पोलीस याप्रकरणी पुढील कारवाई करत आहेत. याआधीही आरोपीनं अशाप्रकराचे कृत्य केलं असल्याचा संशयही व्यक्त केला जातोय. त्या अनुषंगाने पोलिसांकडून आरोपीची चौकशी केली जातेय.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.