Pune crime: 10 वर्षांच्या मुलीचा बलात्कार करणाऱ्या 10 वर्षांचा कारावास आणि 10 हजार रुपये दंड, 8 वर्षांनी निकाल
Pune reape: तब्बल 8 वर्षांनंतर याप्रकरणी आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात (Ambegaon District, Pune) 10 वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार (Minor girl Rape) करणाऱ्या नराधमास शिक्षा सुनावली. 10 वर्षांचा कारावास आणि 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा या आरोपीला सुनावण्यात आली आहे. राजगुरूनगर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. सनिल उर्फ सुनील बबन उधारे असं आरोपीचं नाव आहे. पेठ पारगाव इथं राहणाऱ्या या आरोपीचं वय 31 वर्ष आहे. 3 जुलै 2014 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बलात्काराची (Rape case in Pune) ही घटना घडली होती. दरम्यान, तब्बल 8 वर्षांनंतर याप्रकरणी आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील एका गावात पीडित 10 वर्षाची मुलगी तिच्या लहान भावासोबत शाळेतून घरी पायी जात होती. आरोपी सनिल उर्फ सुनील बबन उधारे याने त्यांना वाटेत गाठले. दुचाकीवर घरी सोडतो असा बहाणा केला. यानंतर आरोपीनं 10 वर्षांच्या मुलीवर पाशवी बलात्कार केला.
थरकाप उडवणारी घटना
शाळेतून घरी जात असताना बहीण-भावाला दुचाकीवर बसवून आरोपी उसाच्या शेताच्या जवळून कच्च्या रस्त्याने दुचाकीवर घेऊन गेला. काहीतरी वाईट हेतू असल्याचे लक्षात येतात पीडित मुलीने दुचाकी थांबवण्यास सांगितली. त्यानंतर दुचाकीवरून उतरून मुलगी तिथून पळू लागली. यानंतर आरोपीने पाठलाग करून तिला पकडलं आणि तिच्यावर पाशवी अत्याचार केला.
48 तासांच्या आत अटक,
पीडित मुलीने ही घटना घरी सांगितली. त्यानंतर आरोपी सनिल उर्फ सुनील बबन उधारे याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. पोलिसांनी कलम 376, बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायदा 2012चं कलम 4, 6, 8, 10, 12 अन्वये गुन्हा दाखल केला. तत्कालीन तपास अधिकारी पोलीस निरीक्षक एम टी जाधव यांनी या बलात्कारप्रकरणी 5 जुलै 2014 रोजी अटक केली होती. दरम्यान, 8 वर्षांनंतर बलात्कार प्रकरणातील आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
हा खटला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक सत्र न्यायालयात न्यायाधीश एस एन राजूरकर यांच्या समोर सुरु होता. या खटल्यात सरकारी वकील रजनी नाईक- देशपांडे यांनी 8 साक्षीदार तपासले. पीडित मुलगी तिचा लहान भाऊ, पंच, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, डॉक्टर यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकारी वकील रजनी नाईक यांचा युक्तिवाद व साक्ष -पुरावे यांच्या आधारे आरोपी सनिल उर्फ सुनील बबन उधारे याला दोषी ठरवण्यात आले. न्यायाधीश एस एन राजूरकर यांनी या खटल्याचा निकाल दिला.
अशी असेल शिक्षा…
आरोपीला दोषी ठरवत 376 अन्वये 10 वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 1 वर्षे साधा कारावास, बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायदा 2012 चे कलम 4 अन्वये 10 वर्षे सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने साधा कारावास, कलम 8 अन्वये 4 वर्षे सश्रम कारावास व 2 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने साधा कारावास, कलम 10 अनव्ये 5 वर्षे सश्रम कारावास व 3 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. दंडाच्या एकूण 20 हजार रुपये रकमेपैकी 15 हजार रुपये पीडित मुलीला देण्याचा आदेश दिला. या खटल्याचे न्यायालयीन कामकाज पोलीस आर एम जाधव, एम आर बटवाल यांनी पहिले.
संबंधित बातम्या:
लिफ्ट देण्याचा बहाणा! ट्रकमध्ये बसवून आळीपाळीनं बलात्कार, नंतर प्रेत नदीत फेकलं
Pune Murder : पुण्यात आठ वर्षीय मुलाची डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून हत्या
डॉक्टरांना धमकी देऊन खंडणी घेणारा सराईत पुण्यातल्या लोणी काळभोर पोलिसांच्या कचाट्यात!