Pune Crime : 10 दिवसांचा नवजात चिमुरडा बेवारस अवस्थेत टेम्पोत आढळल्यानं आंबेगावात खळबळ! 

Pune infant News : टेम्पोतील सामान ठेवायच्या जागेत हे बाळ कपड्यात गुंडाळलेलं आढलून आलं.

Pune Crime : 10 दिवसांचा नवजात चिमुरडा बेवारस अवस्थेत टेम्पोत आढळल्यानं आंबेगावात खळबळ! 
मॅटर्निटी लिव्हबाबत केंद्राचा नवा आदेशImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 2:33 PM

पुणे : एक दहा दिवसांचं नवजात बाळ (Infant) आढळून आल्यानं आंबेगावात खळबळ उडाली आहे. कात्रज-देहू (Katraj Dehu bypass Road) रस्त्यावर एका टेम्पोमध्ये हे बाळ आढळून आलं. आढळून आलेलं बाळ हा एक मुलगा असून कुणीतरी त्याला कपड्यात लपेटून सोडून गेलं असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. शनिवारी कात्रत-देहू बायपास रस्त्यावरील टेम्पोमध्ये रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एक बाळ रडत असल्याचा आवाज येऊ लागल्यानं एका व्यक्तीनं पाहणी केली. त्यावेळी टेम्पोतील सामान ठेवायच्या जागेत हे बाळ कपड्यात गुंडाळलेलं आढलून आलं. यानंतर आजूबाजूला मोठ्या प्रमाणात लोकं जमले. याबाबती माहिती नंतर पोलिसांना (Pune crime News) देण्यात आली. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली आणि बाळाला ताब्यात घेतलं. अवघ्या 10 दिवसांतं हे बाळ नाजूक असल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती पोलिसंनी दिली. या बाळाला निर्दयीपणे कोण टेम्पोत सोडून गेलं असावं? याचा आता पोलीस शोध घेत आहेत.

बाळाची प्रकृती आता कशीय?

टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या बाळाची प्रकृती स्थिर असून आता हे बाळ ससून रुग्णालयात आहे. ससून रुग्णालयातील जनरल वॉर्डमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली या बाळाला ठेवण्यात आलं आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथील वरीष्ठ पोलीस निरीक्षक जग्गनाथ कळसकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. सामान वाहून नेणाऱ्या एका तीन चाकी टेम्पोच्या मागच्या बाजूला हे बाळ आढळून आलं होतं, असं ते म्हणाले.

पालकांना शोधण्याचं आव्हान

दरम्यान, ज्या भागात हे नवजात बाळ आढळून आलं, तिथं सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. त्यामुळे नेमकं या बाळाला टेम्पोमध्ये कुणी सोडलं, याचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. मात्र ज्या कपड्यांत या बाळाला गुंडाळण्यात आलं होतं, त्या कपड्याकडे पाहता, हे बाळ एका चांगल्या घरातील असावं, अशी शंका व्यक्त् केली जाते आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, या बाळाच्या हातावर एक टॅगही आढळून आला आहे. नुकत्याच जन्मलेल्या बाळांच्या हातावर आढळून येणाऱ्या टॅगप्रमाणे या बाळाच्या हातावरही हा टॅग होता. या टॅगच्या मदतीने आता पोलीस आजूबाजूच्या मॅटरनिटी हॉस्पिटलमध्ये चौकशी करत असून त्यातून काही माहिती मिळते का, याचा प्रयत्न करत आहेत. या बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेतला जात असून त्यासाठी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहेत. पथकंही त्यासाठी तैनात करण्यात आली आहेत.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.