AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TET Exam : पुणे पोलिसांकडून टीईटी परीक्षा प्रकरणी अटकसत्र सुरु, बंगळुरुतून आश्विन कुमार, बीडमधून संजय सानपला ठोकल्या बेड्या

बीडमधून आणखी संजय सानप याला अटक झालीय. जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला बंगळूरमधून अटक करण्यात आलीय.

TET Exam : पुणे पोलिसांकडून टीईटी परीक्षा प्रकरणी अटकसत्र सुरु, बंगळुरुतून आश्विन कुमार, बीडमधून संजय सानपला ठोकल्या बेड्या
संजय सानप
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 10:18 AM

पुणे: टीईटी परीक्षा घोटाळ्या प्रकरणी कुंपणानंच शेत खालल्याचं समोर आलंय. टीईटी पेपर फुटी प्रकरणी परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे याला अटक झालीय. तुकाराम सुपेचं कालचं निलंबन करण्यात आलं आहे. तर, बीडमधून आणखी संजय सानप याला अटक झालीय. जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला बंगळूरमधून अटक करण्यात आलीय.

बंगळुरुतून एकाला अटक

जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला बंगळूरमधून अटक करण्यात आलीय. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणी थेट राज्याबाहेर कारवाई केलीय.या प्रकरणाचे धागेदोरे हे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताना दिसतंय. 2017 मध्ये आश्विन कुमार हा जी ए टेक्नॉलॉजीचा संचालक होता. प्रीतिश देशमुखचा हा वरिष्ठ होता. सुखदेव डेरे हे औरंगाबाद विभागीय बोर्डाचे अध्यक्ष होते. त्यांना अटक केलीय. यापूर्वी डेरेंना निलंबित करण्यात आली होती. या प्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसत आहे.

संजय सानपला बीडमधून अटक

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात सायबर पोलिसांनी एकाला बीड मधून अटक केली. संजय शाहूराव सानप (40 रा. वडझरी, ता.पाटोदा, जिल्हा बीड ) याचा या गुन्हयात सहभाग असल्याचे आढळल्याने त्यास अटक करण्यात आलीय.

तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर यांच्यासह आणखी एकजण अटकेत म्हाडा पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्रीतिश देशमुखच्या चौकशीतून टीईटी परीक्षेचा घोळ समोर आला. त्यानंतर पुणे सायबर पोलिसांनी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) आणि अभिषेक सावरीकर (Abhishek Savarikar) यांच्यासह आणखी एकाला अटक केली होती. सुपेच्या चौकशीनंत पुणे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात त्यांना 88 लाख रोख आणि सोनं मिळून 89 लाखांचा ऐवज जप्त केला होता. पोलिसांनी सोमवारी आणखी एकदा छापा टाकून 1 कोटी 59 लाखांची रोकड आणि 70 लाखांचं सोनं जप्त केलं आहे.

इतर बातम्या:

Weather Alert : राज्यात हुडहुडी कायम, सांगलीत शेकोट्या पेटल्या, भंडाऱ्यात पारा 9 अंशांवर! 

SSC Exam : दहावीच्या परीक्षेचे अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ; बोर्डाकडून नव्या तारखा जाहीर

Pune Police Arrested Ashwin Kumar director of GA Technologies and Sanjay Sanap from beed in connection to Maha TET exam Scam