Pune Crime : 7 वर्षांच्या मुलीचं अपहरण करुन बलात्कार आणि हत्या! पुण्याच्या माळव मधील खळबळजनक घटना, नराधमाला अटक

Pune Rape And Murder Case : सात वर्षांच्या चिमुरडीची हत्या करण्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता, याचा खुलासा पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमधून झाला.

Pune Crime : 7 वर्षांच्या मुलीचं अपहरण करुन बलात्कार आणि हत्या! पुण्याच्या माळव मधील खळबळजनक घटना, नराधमाला अटक
खळबळजनक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 8:08 AM

पुणे : पुणे जिल्हा बलात्कार आणि हत्येच्या (Pune Rape And Murder Case) घटनेनं पुन्हा एकदा हादरला आहे. पुणे जिल्ह्याच्या (Pune crime news) मावळ तालुक्यात काळीज हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. एका सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. इतकंच नाही, तर नंतर या सात वर्षांच्या मुलीची हत्यादेखील करण्यात आली. या घटनेमुळे मावळ तालुक्याचं संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी पोलिसांनी या घटनेबाबातची माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटकही करण्यात आलीय. या नराधमाची चौकशी पोलिसांकडून सुरु आहे. 10 ऑगस्टपर्यंत या नराधमाला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. मंगळवारी एक सात वर्षांची चिमुरडी (Seven year old girl rape and murdered) बेपत्ता झाली होती. घरातूनच या मुलीचं अपहरण करण्यात आलेलं होतं. या मुलीचा शोध घेतला जात असतानाच आता समोर आलेल्या खळबळजनक घटनेनं सगळ्यांचा मोठा धक्का बसलाय.

नराधमाला अटक

अपहरण, बलात्कार आणि हत्या अशा तीन गुन्ह्यांखाली 24 वर्षांच्या तेजस दळवी नावाच्या नराधमाला अटक करण्यात आली आहे. कामशेत पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. सात वर्षांच्या चिमुरडीचं तेजसने तिच्या घरातूनच अपहरण केलं होतं. घरातून या चिमुरडीला पळवून नेल्यावर तेजसने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिचा खूनही केला. मंगळवारपासून ही चिमुरडी बेपत्ता होती. तिचा मृतदेह हाती लागल्यानंतर पोलिसांनी तो पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला होता. त्यानंतर पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा करण्यात आला.

पोस्ट मॉर्टेमधून धक्कादायक खुलासा

सात वर्षांच्या चिमुरडीची हत्या करण्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता, याचा खुलासा पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमधून झाला. त्यानंतर पोलिसांनी हत्येसोबत बलात्काराचाही गुन्हा नोंदवून घेतला आहे. यानंतर पोलिसांनी लगेचच नराधम आरोपीविरोधात अटकेची कारवाई केली. आरोपी तेजस दळवी याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 10 ऑगस्टपर्यंत तेजस दळवीला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. सध्या कामशेत पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत असून नराधमाची कसून चौकशी पोलिसांकडून केली जातेय.

हे सुद्धा वाचा

कठोर कारवाईची मागणी

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांनुसार पीडित मुलीची, तसंच तिच्या कुटुंबीयांची ओळख उघड करण्यात आलेली आहे. मात्र या घटनेनं पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला असून आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...