Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरगुती वापराच्या गॅस टाकीतून कमर्शियल टाकीत गॅस भरुन काळाबाजार! शिरुरमधील टोळीचा पर्दाफाश

Pune Crime : बेकायदेशीरपणे गॅस भरला जात असल्याकारणानं पोलिसांनी याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारलाय.

घरगुती वापराच्या गॅस टाकीतून कमर्शियल टाकीत गॅस भरुन काळाबाजार! शिरुरमधील टोळीचा पर्दाफाश
टोळीचा पर्दाफाशImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 8:18 AM

पुणे : शिरुर (Shirur Gas News) तालुक्यात गॅसचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी (Shirur Police) पर्दाफाश केलाय. याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत टोळीच्या मुसक्या आवळल्या असून मोठ्या प्रमाणात मुद्देमालदेखील हस्तगत केला आहे. घरगुती वापराच्या गॅस टाकीमधून (Gas Cylinder) कमर्शियल टाक्यांमध्ये गॅस भरुन विक्री केली जात होती. बेकायदेशीरपणे गॅसचा काळाबाजार होत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शिरुर तालुक्यातील मलठण इथे धाड टाकत गॅसचा काळाबाजर करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. पिन कनेक्टरच्या मदतीनं बेकायदेशीररीत्या गॅस भरुन बाजारात चढ्या दरानं ही टोळी गॅसची विक्री करत असल्याचं तपासात समोर आलंय. या टोळीतील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

कुणा-कुणाला अटक?

मोल फुलसुंदर, मलप्पा नरवटे,बसवराज नानाजे,सिध्दाराम बिराजदार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. चौघांची टोळी घरगुती गॅस सिलेंडर टाक्या मधून कमर्शियल व्यावसायीक गॅसच्या टाक्यामध्ये पिनच्या कनेक्टरच्या सहाय्याने गॅस भरत होते. अशाप्रकारे गॅस भरल्यानं जीवाला धोका निर्माण होण्याची भीती असते. बेकायदेशीरपणे गॅस भरला जात असल्याकारणानं पोलिसांनी याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारलाय.

पाहा Video : गावागावातली बातमी

हे सुद्धा वाचा

11 लाखाच मुद्देमाल जप्त

या कारवाईदरम्यान, पोलिसांनी भारत गॅस कंपनीच्या 80 टाक्या, एचपी गॅसच्या कंपनीच्या 100 टाक्या, कमर्शियल व्यावसायीक 93 टाक्या व छोटया 3 टाक्या तसेच गॅस टाक्या भरण्याकरीता वापरण्याच्या एकूण 40 पीन जप्त करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे एक चारचाकी वाहनांसह एकूण 11 लाख 4 हजार 650 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

सध्या अटक करण्यात आलेल्या चौघांही आरोपींची कसून चौकशी केली जाते आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी याआधीही गॅसचा काळाबाजार सुरु असल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केलेली आहे. दरम्यान, गॅसच्या काळाबाजाराचं हे रॅकेट मुळासकट उपटून काढण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.