एका रात्रीत 13 दुकानं फोडली! सापासारखे शिरले, लाखोंचा माल लुटून फरार, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला चोरीचा थरार
Pune Shirur Crime News : संपूर्ण शटर न तोडता, चोरांनी शटरचा काही भाग वाकवला. त्यानंतर दुकानाचं दार हळूच उघडून चोरटे सापासारखे दुकानात शिरल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आलंय. यानंतर दुकानातील सामानावर बॅटरीच्या मदतीने त्यांनी नजर टाकली.
पुणे : पुणे जिल्ह्यामध्ये एका रात्रीमध्ये तब्बल 13 दुकानं फोडण्यात (Pune crime news) आली आहेत. चोरीची ही घटना शिरुर तालुक्यातील मांडवगण (Mandavgan) फराटा इथं घडली. शिरुरमधील (Shirur Theft) दुकानांमध्ये झालेल्या चारीच्या घटनेनं दुकानदारांचे मालक प्रचंड दहशतीत आहेत. मध्यरात्री तब्बल 13 दुकानांमध्ये चोरी झाल्याचं सकाळी उघडकीस आली. चोरीच्या या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. दुकानाच्या आतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. पण चेहरे झालेले असल्यामुळे या चोरट्यांची ओळख पटू शकलेली नाही. आता या चोरट्यांना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय. 13 दुकानं फोडून लाखो रुपयांच्या वस्तूंवर चोरांनी डल्ला मारला. या प्रकरणी पोलिसातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि सर्व दुकानदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना चोरांना पकडण्यासाठी तापसही सुरु केलाय.
मांडवगण सकाळी 3 ते 4 च्या दरम्यान 13 दुकांनांवर दरोडा पडल्याची माहिती एका स्थानिक दुकानदाराने दिली. या 13 दुकानांपैकी एक चोरी कॅमेऱ्याच्या दुकानातही झाली. या कॅमेऱ्याच्या दुकानातून साडे तीन लाख रुपयांची चोरी करण्यात आली. तर काही दुकानांमधून सामान चोरीला गेलं असून काही दुकानांमधून कॅशही लंपास करण्यात आली असल्याचं दुकानदारांनी म्हटलं. दरम्यान, मांडवगण येथील आसपासच्या सहा गावांसाठी फार मोठा धोका, असल्याचं यावेळी दुकानदारांनी म्हटलंय. सध्या गावातील इतर ठिकाणीही चोरांची प्रचंड दहशत शिरुर तालुक्यात पसरली आहे. त्यामुळे रात्री झालेल्या दरोड्याच्या या घटनेचा लवकराच लवकर छडा लागावा, अशी मागणी स्थानिक दुकानदारांनी केली जातेय.
दरम्यान, चोरीची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालीय. दुकानाला लावलेलं शटर वाकून त्यातून छोटीशी जागा करत चोरटे दुकानात शिरत असल्याचं दिसून आलंय.
पाहा चोरीचा थरार
#Pune : सापासारखे आत शिरले आणि चोरी करुन फरार! शिरुर तालुक्यात एका रात्रीत 13 दुकानं फोडली, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात केद झाला चोरीचा थरार #crime #WATCH pic.twitter.com/neRwR4u1Aj
— Siddhesh Sawant (@ssidsawant) August 31, 2022
संपूर्ण शटर न तोडता, चोरांनी शटरचा काही भाग वाकवला. त्यानंतर दुकानाचं दार हळूच उघडून चोरटे सापासारखे दुकानात शिरल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आलंय. यानंतर दुकानातील सामानावर बॅटरीच्या मदतीने त्यांनी नजर टाकली. दुकानातील ड्रॉव्हर आणि इतर सामान तपासून त्यावर चोरट्यांनी हात साफ केल्याचं दिसून आलंय. तब्बल 13 दुकानांवर दरोडा पडल्यानं शिरुरमध्ये खळबळ माजली. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर चोरांना बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक सर्वसामान्य दुकानदारांकडून केली जातेय.