Pune Suicide : पुण्यात 25 वर्षीय तरुण व्यावयायिकाच्या आत्महत्येनं खळबळ! स्वतःवर गोळी झाडून घेतली

Pune crime News : कुटुंबातील वाद, एकटेपणा, नैराश्य यातूनच तरुण व्यावययिकाने गोळ्या घालून जीव दिला असावा, अशी शंका पोलिसांनी प्राथमिक तपासातून व्यक्त केलीय.

Pune Suicide : पुण्यात 25 वर्षीय तरुण व्यावयायिकाच्या आत्महत्येनं खळबळ! स्वतःवर गोळी झाडून घेतली
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 8:42 AM

पुणे : 25 वर्षीय तरुण व्यावसायिकाने आत्महत्या (Pune Suicide News) केल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली. हडपसरच्या (Hadapsar, Pune) भागिरथीनगर इथं रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. रात्री 9 वाजता पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. देशी रिव्हॉल्व्हरने तरुणानं स्वतःवर गोळी झाडून घेत जीव दिल्याची माहितीही समोर आलीय. दरम्यान, या तरुणानं आत्महत्या का केली, याबाबत तपास केला जात असून हडपसर पोलिसांनी (Pune Crime News) आत्महत्याप्रकरणाची नोंद करुन घेतली आहे. प्राथमिक तपासात पत्नीसोबतच्या असलेल्या तणावपूर्ण संबंधांतून तरुण व्यावसायिकानं जीव दिल्याचं सांगितलं जातंय. या तरुण व्यावसायिकाचं नुकतच लग्न झालं होतं. लग्नाला एक वर्षही झालं नव्हतं. पण पत्नीसोबत झालेल्या वादामुळे हा तरुण प्रचंड अस्वस्थ होतं. भांडण झाल्यामुळे या व्यावयायिक तरुणाची पत्नी पतीपासून वेगळी राहत होती. त्यामुळे नैराश्य आलेल्या या तरुण व्यावसायिकानं अखेर आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवलीय.

कळलं कसं?

हडपसर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली. एक मित्र जेव्हा या तरुणाच्या घरी पोहोचला तेव्हा ही घटना उघडकीस आली. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी याबाबत फोनवरुन कळवण्यात आलं होतं. त्यानंतर तरुणाच्या आत्महत्येबाबतची माहिती समोर आली. दरम्यान, पोलिसांनी आत्महत्या केलेल्या तरुणाच्या घराची पाहणी केली असता त्यांना कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही. गोळी घालून घेतलेल्या तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. या तरुणाचा मृतदेह पोलिसांनी पोस्ट मॉर्टेमसाठी पाठवला आणि पुढीत तपासालाही सुरुवात केली.

नुकतंच लग्न झालेलं…

आत्महत्या करण्यात आलेला तरुणा हडपसरमध्येच एक हॉटेल चालवत होतं. एका प्रतिष्ठीत कुटु्ंबातील हा तरुण असून त्याचं डिसेंबर महिन्यात लग्न झालं होतं. पण लग्नानंतर त्याचे पत्नीसोबत वाद सुरु झाले होते. त्यानंतर त्याची पत्नी त्याला सोडून वेगळी राहू लागली होती. आत्महत्या केलेला तरुण एकटाच राहत होता. त्याने नीट वागावं, पत्नीलाही नीट वागवावं यासाठी त्याच्या कुटुबीयांनीही या तरुणाप्रती नाराजी व्यक्त केली होती, असंही सांगितलं जातंय. आपल्या सवयी बदलाव्यात, असा सल्लाही तरुणाला देण्यात आल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलंय.

हे सुद्धा वाचा

आत्महत्या करण्याआधी हा तरुण मानसिकरीत्या प्रचंड अस्वस्थ होता. कुटुंबातील वाद, एकटेपणा, नैराश्य यातूनच तरुण व्यावययिकाने गोळ्या घालून जीव दिला असावा, अशी शंका पोलिसांनी प्राथमिक तपासातून व्यक्त केलीय. आता आत्महत्या केलेल्या तरुणाच्या नातलगांची आणि त्याच्या सासरकडच्या लोकांचीही पोलिसांकडून चौकशी केली जातेय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.