Pune : कामावरुन काढल्याचा राग, मृत्यूचं कारण ठरली भयंकर आग! टेलरनं मालकिणीला पेटवलं, दोघेही ठार

Pune Wadgaon Sheri Crime : सात दिवस अगोदर त्याला नोकरीवरुन काढण्यात आलं होतं.

Pune : कामावरुन काढल्याचा राग, मृत्यूचं कारण ठरली भयंकर आग! टेलरनं मालकिणीला पेटवलं, दोघेही ठार
टेलरनं उचचलं टोकाचं पाऊलImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 7:03 AM

पुणे : पुण्यातील (Pune crime) वडगाव शेरीमध्ये धक्कादायक घटना घडली. कामावरुन काढल्याच्या रागातून (Sack employee) एकानं महिलेला पेटवून दिलं. यामध्ये महिलेला पेटवून देणाराही आगीत होरपळला. आगीत होरपळेल्या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र अखेर दोघांचाही भाजून मृत्यू झाला आहे. एका टेलरिंग दुकानात काम करणाऱ्याला त्याच्या मालकिणीनं कामावरुन काढून टाकलं होतं. याचा राग मनात ठेवून या कामगारानं आपल्या मालकिणीवर आधी पेट्रोल (Petrol) टाकलं. त्यानंतर तिला पेटवून दिलं. या धक्कादायक घटनेमध्ये महिलेला पेटवून देणारा कामगारही प्रचंड होरपळला. त्याच्याही शरीरानं पेट घेतला. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या दोघांचा या धक्कादायक घटनेमध्ये मृत्यू झाला. वडगाव शेरीमध्ये घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली. सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळी या दोन्ही जखमी झालेल्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली.

नेमकं काय घडलं?

चंदन नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिलिंद नाथसागर हा 35 वर्षांचा इसम टेलरिंगची नोकरी करत होता. बाला नोया जोनिंग या 32 वर्षांच्या महिलेच्या टेलरींगच्या दुकानामध्ये तो कामाला होता. दरम्यान, बाला नोया जोनिंगनं मिलिंदला कामावरुन काढून टाकलं होतं. त्यानंतर प्रचंड संतापात असलेल्या मिलिंदने टोकाचं पाऊल उचललं. आधी त्यानं बाला नोया जोनिंगच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं. नंतर स्वत:देखील तो या आगीमध्ये होरपळला.

वाचवायला गेलेलाही जखमी

या संपूर्ण घटनेत एक प्रथमेश नावाचा एक जण या सगळ्यात गंभीर जखमी झाला. आगीची घटना घडली, तेव्हा वाचवण्यासाठी गेलेल्या प्रथमेशला गंभीर जखमा झाल्यात. दोघांना वाचण्यासाठी गेलेल्या जखमी प्रथमेशवर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हे सुद्धा वाचा

स्टेटस बदलला

याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून घेतला आहेत. पोलीस इन्स्पेक्टर सुनिल जाधव यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मिलिंद हा मूळचा परभणीचा आहे. तो गेल्या आठ वर्षांपासून या महिलेचा दुकानात नोकरी करत होता. टेलरचं काम करणाऱ्या मिलिंदला नोकरीवरुन काढल्याचं सहन नाही झालं आणि त्यानं टोकाचं पाऊल उचललं. सात दिवस अगोदर त्याला नोकरीवरुन काढण्यात आलं होतं. टोकाचं पाऊल उचलण्याआधी मिलिंदनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरील स्टेटही बदलले होते, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.