AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सॉफ्टवेअर इंजिनिअरचीही फसवणूक, सायबर भामट्यांनी अभियंत्यासह आठ जणांना कसे फसवले

Pune Crime News : पुणे शहरात फसवणुकीचा नवीन प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उच्च शिक्षण घेतलेल्या व्यक्तीची फसवणूक झाली आहे. आठ जणांची फसवणूक झाली आहे.

सॉफ्टवेअर इंजिनिअरचीही फसवणूक, सायबर भामट्यांनी अभियंत्यासह आठ जणांना कसे फसवले
Follow us
| Updated on: Aug 27, 2023 | 11:22 AM

पुणे | 27 ऑगस्ट 2023 : राज्यात ऑनलाइन फसवणुकीचे अनेक प्रकार घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सायबर फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. ऑनलाईन फसवणुकीत सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे उच्च शिक्षित लोकही अडकत आहेत. पुण्यात सायबर चोरट्यांनी चक्क महिला आयटी अभियंत्यासह आठ जणांची फसवणूक केली आहे. चांगल्या परताव्याचे लालच आणि टास्क देऊन ही फसवणूक झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सायबर फसवणुकीचे प्रकार वाढत असताना गुन्ह्यांचा तपास लागण्याचे प्रमाण नगण्य आहे. यामुळे खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.

काय घडला प्रकार

पुणे शहरातील ३६ वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरबाबत हा प्रकार घडला आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरसह एकूण आठ जणांची 25.65 लाखांत फसवणूक झाली आहे. या प्रकरणी पुण्यातील चंदननगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते एप्रिल महिन्यात ही घटना घडली आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी सांगितले की, फिर्यादीला ऑनलाइन इन्कमसंदर्भात मोबाईलवर मेसेज आला. या कामाच्या बदल्यात चांगले उत्पन्न मिळणार असल्याचे फिर्यादीला सांगण्यात आले. मग सुरुवातील कामाच्या बदल्यात काही रक्कम दिली.

अशी झाली फसवणूक

फिर्यादीचा विश्वास संपादन केल्यानंतर अजून चांगले उत्पन्न हवे असल्यास गुंतवणूक करण्याचे सांगितले. महिला अभियंत्याने त्यांच्यावर विश्वास ठेवत 5.22 लाख रुपये दिलेल्या बँक खात्यात वर्ग केले. त्यानंतर अजून पैशांची मागणी होऊ लागली. आपण फसवले गेल्याचे त्यांना लक्षात आल्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर भामट्यांनी असाच प्रकार इतर काही जणांसोबत केला आहे.

हे सुद्धा वाचा

सायबर गुन्हे वाढले, सावध व्हा

राज्यात सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. सायबर भामटे विविध प्रकारे लोकांना फसवत आहेत. यामुळे कोणालाही आपल्या बँकेचे डिटेल्स शेअर करु नका. घरबसल्या ऑनलाईन कामे देणाऱ्या या टोळ्यापासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.