Pune Accident : पीएमटी बसच्या धडकेत बाईकस्वार तरुण ठार! विवाहीत आकाशच्या मृत्यूने कुटुंबीयांवर शोककळा

Pune PMT BUS Accident : आकाश विल्सन पिल्ले हा येरवडा गाडीतळ इथं राहायला होता. तो दुचाकीवर जात होता.

Pune Accident : पीएमटी बसच्या धडकेत बाईकस्वार तरुण ठार! विवाहीत आकाशच्या मृत्यूने कुटुंबीयांवर शोककळा
पुण्यात बसचा अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 3:04 PM

पुणे : बसच्या धडतकेत तरुणाचा जीव गेल्याची घटना पुणे जिल्ह्यातील (Pune District) विश्रांतवाडी इथं घडली. या अपघातामध्ये (Pune PMT Accident) विवाहीत तरुणाचा जीव गेला आहे. त्यामुळे मृत तरुणाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत तरुमाचं नाव आकाश विल्सन पिल्ले असं असून आकाश हा येरवडा गाडीतळ इथं राहायला होता. पीएमटी बसने आकाशच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की आकाशचा जागीच मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी पीएमटी बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएमसी बसच्या चालकाचं नाव अज कामठे असून त्यांच्यावर विश्रांतावडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघात प्रकरणी (Pune Accident News) पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र तरुणाच्या मृत्यूने विश्रांतवाडीवर शोककळा पसरली आहे. मंगळवारी रात्री हा अपघात झाला.

आकाश विल्सन पिल्ले हा येरवडा गाडीतळ इथं राहायला होता. तो दुचाकीवर जात होता. त्यावेळी पीएमसी बसची त्याच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. पीएमटीची ही बस आळंदीहून स्वारगेटला जात होती. दरम्यान, डेक्कन कॉलेज जवळ झालेल्या या भीषण अपघातात आकाश गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान, त्याचा मृ्यू झाला.

हे सुद्धा वाचा

दुचाकीवरुन जाताना काळीज घेण्याची गरज

दुचाकीवरुन प्रवास करताना हेल्मेट वापरण्याची नितांत गरज असल्याचं या घटनेवरुन अधोरेखित झालं आहे. तसंच अपघातात होऊ नयेत, यासाठी वाहन चालवताना अधिक सतर्क राहण्याची आणि वेगावर मर्यादा ठेवण्याचीही आवश्यकता आहे. त्यामुळे अपघात रोखायचे असतील, तर वाहतुकीचे सर्व नियम पाळण्यासोबत सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी दुचाकी चालकांनी बाळगणं गरजेचं आहे. तसं केल्यानंतरही अपघाताचा धोका टळतो असं नाही. मात्र किमान अपघात होण्याची भीती कमी होते. वेगानं आणि बेदरकारपणे गाड्या चालवून अपघाताला निमंत्रण देण्यापेक्षा संतुलित वेग पाळावा, असं आवाहन दुचाकीस्वारांना केलं जातंय.

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.