Siddhu Moosewala Murder : पुणे जिल्ह्यातील 11 जण बिश्नोई गँगशी संबंधित, सौरभ महाकाळच्या चौकशीत माहिती उघड

मुसेवाला हत्या प्रकरणानंतर बिश्नोई गॅंग एकदम चर्चेत आली आहे. त्यानंतर सलमान खान प्रकरणही समोर आले होते. महाकाळची पंजाब पोलिसांनी चौकशी करण्यात आली आहे. तसेच पोलिसांकडून त्याच्याकडून दररोज माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहेत. अजून पुणे जिल्ह्यातील किती अल्पवयीन मुले यांच्या संपर्कात आहेत, याचा शोध ग्रामीण पोलीस घेत आहेत.

Siddhu Moosewala Murder : पुणे जिल्ह्यातील 11 जण बिश्नोई गँगशी संबंधित, सौरभ महाकाळच्या चौकशीत माहिती उघड
saurav mahakalImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 8:24 PM

पुणे : सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील शार्प शूटर म्हणून सहभाग असलेला सौरभ महाकाळ (Saurabh Mahakal) उर्फ सिद्धेश कांबळे याला पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक (Arrest) करण्यात आली. त्याच्या अटकेनंतर पंजाब, दिल्ली आणि मुंबई पोलिसांकडून त्याची चौकशी (Inquiry) करण्यात येत आहे. त्यात आता नवीन माहिती समोर आली आहे. सौरभ महाकाळकडून पुणे जिल्ह्यातील 11 हून अधिक जण संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून टीव्ही 9 ला मिळाली आली आहे. या माहितीने बिश्नोई गॅंगशी संबंधित असणाऱ्या पुणे जिल्ह्यासह पंजाब आणि इतर राज्यातील गुन्हेगारांची संख्या लवकरच बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सौरभ महाकाळ उर्फ सिद्धेश कांबळे याला ग्रामीण पोलिसांनी काही दिवसांपूर्वी संगमनेर येथून अटक केली होती. त्यानंतर या घटनेत दररोज नवीन खुलासे होताना दिसत आहे. मात्र महाकाळने दिलल्या माहितीतील ते 11 जण कोण ? याची चर्चा आता पुणे जिल्ह्यात सुरू झाली आहे.

फरार संतोष जाधव अल्पवयीन गुन्ह्यांमध्ये वापर करत होता

मुसेवाला हत्या प्रकरणानंतर बिश्नोई गॅंग एकदम चर्चेत आली आहे. त्यानंतर सलमान खान प्रकरणही समोर आले होते. महाकाळची पंजाब पोलिसांनी चौकशी करण्यात आली आहे. तसेच पोलिसांकडून त्याच्याकडून दररोज माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहेत. अजून पुणे जिल्ह्यातील किती अल्पवयीन मुले यांच्या संपर्कात आहेत, याचा शोध ग्रामीण पोलीस घेत आहेत. संतोष जाधव याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. संतोष जाधव याचाच साथीदार महाकाळ याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हगारी प्रवृत्तीची क्रेझ वाढताना पहायला मिळत असून याचा फायदा घेत संतोष जाधव अल्पवयीन मुलांचा वापर अनेक गुन्ह्यांमध्ये करत होता. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील किती अल्पवयीन मुलांची नावे समोर येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Saurabh Mahakal interrogation revealed that 11 people from Pune district belonged to Bishnoi gang)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.