पुणे मार्केट यार्ड फायरिंग प्रकरण, सात आरोपींना अटक

आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी पाच पथकं तयार केली होती. पोलीस आरोपींचा कसून शोध घेत होते. या घटनेत एकूण 11 आरोपींचा समावेश होता. यापैकी सात आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.

पुणे मार्केट यार्ड फायरिंग प्रकरण, सात आरोपींना अटक
सहा दूध उत्पादकांना अटकImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Nov 14, 2022 | 5:12 PM

पुणे : पुण्यातील मार्केट यार्डमध्ये गोळीबार करत 28 लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या सात आरोपींच्या मुसक्या आवळण्यास पुणे पोलिसांना यश आले आहे. मार्केट यार्डमधील अंगडिया व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसून आरोपींनी एक राऊंड फायरिंग केली. मग बंदुकीचा धाक दाखवत कार्यालयातील 28 लाखाची रोकड लुटत पसार झाले होते. याप्रकरणी पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत होते.

पोलिसांनी कसून शोध घेत सात जणांना जेरबंद केले

आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी पाच पथकं तयार केली होती. पोलीस आरोपींचा कसून शोध घेत होते. या घटनेत एकूण 11 आरोपींचा समावेश होता. यापैकी सात आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.

आरोपी सराईत गुन्हेगार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींवर याआधी देखील विविध गुन्हे दाखल आहेत. विविध गुन्ह्यांमध्ये यातील आरोपी हे येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होते.

हे सुद्धा वाचा

अंगडिया कार्यालयातील लुटीचा कट पूर्वनियोजित

अंगडिया या व्यावसायिकाच्या कार्यालयातून पैसे लुटण्याचा त्यांचा कट देखील पूर्वनियोजित होता. हे बहुतांश आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून ते पुण्यातील मंगळवार पेठ, शिवाजीनगर, शिवणे या भागात रहायचे. यापैकी दोघांवर मोक्का दाखल आहे. अंगडियावर दरोडा टाकला तरी ते पोलिसात जाणार नाहीत, असा विश्वास आरोपींनी होता. यातूनच त्यांनी हा दरोड्याचा कट रचला तसेच तिथे गोळीबार देखील केला होता.

गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून केले अटक

तपासादरम्यान हे आरोपी मावळमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मावळमध्ये सापळा रचून आरोपींना अटक केली. यापैकी 4 आरोपी अद्याप फरार असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

सीसीटीव्हीच्या आधारे क्राईम ब्रँचने अवघ्या 48 तासात आरोपी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 14 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.