Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sidhu Moose Wala: मुसावाल्याच्या हत्येचं महाराष्ट्र कनेक्शन! गोळ्या झाडणाऱ्या 8 पैकी 2 शूटर पुण्यातले, मुसात मुळशी पॅटर्न?

Sidhu Moose Wala Death News : पुण्यातील दोघा शूटरची नावंही समोर आलीत.

Sidhu Moose Wala: मुसावाल्याच्या हत्येचं महाराष्ट्र कनेक्शन! गोळ्या झाडणाऱ्या 8 पैकी 2 शूटर पुण्यातले, मुसात मुळशी पॅटर्न?
सिद्धू मुसावाला हत्या प्रकरणातील आरोपीला अटकImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 11:26 AM

पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose wala) याच्या हत्येची कबुली लॉरेन्स बिश्नोईने दिली. त्यानंतर आता या हल्ल्याबाबात नवनवे खुलासे रोज होत आहेत. महत्त्वाचं म्हणजे सिद्धू मुसावालाच्या हत्येचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय. सिद्धू मुसावालाच्या हत्येसाठी (Sidhu Moose wala murder News) 8 शूटर बोलवण्यात आले होते. त्यापैकी दोघे हे महाराष्ट्रातील असल्याचं समोर आलंय. महाराष्ट्राच्या पुण्यातून पंजाबमध्ये हत्याकांड करण्यासाठी दोघा शूटरला बोलावण्यात आलं होतं, अशी खळबळबजनक माहिती उघडकीस आली आहे. पुण्यातील (Moose wala death Maharashtra Connection) दोघा शूटरची नावंही समोर आलीत. संतोष जाधव आणि सौरव महाकाळ अशी या दोघा शूटर्सची नावं आहेत. मुसावाली हत्या करण्यासाठी तीन राज्यातील आठ शूटर मागवण्यात आले होते. त्यापैकी तिघे पंजाबमधील, तिघे राजस्थानमधील आणि दोघे महाराष्ट्रातील होते. आता याप्रकरणी अधिक तपास केला जातोय. सौरभ महाकाळ याला मंचरवरून तर संतोष जाधव याला पुण्यातून ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहितीही समोर येतेय.

पुण्यातील ते आरोपी हेच आहेत :

Siddhu Moose wala murder death News Pune Connection

मुसात मुळशी पॅटर्न?

थोडक्यात पण महत्त्वाचं

  1. सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्या आठ शूटर्सही ओळख पटली
  2. आठपैकी दोघेजण पुण्यातील
  3. संतोष जाधव आणि सौरव महाकाळचाही हत्याकांडात हात
  4. आठ राज्यातून मागवण्यात आले होते तीन शार्पशूटर
  5. पंजाब, राजस्थानातून प्रत्येकी तीन शूटर मागवले
  6. पुण्यातून दोघा शूटर्सला हत्येसाठी बोलावण्यात आलं होतं
  7. पंजाब पोलिसांकडून हत्याप्रकरणी अधिक तपास सुरु

काय आहे घटना?

सिद्धी मुसेवाला याची 29 मे रोजी हत्या करण्यात आली. भर दिवसा जीपमधून जात असताना मूसा मध्ये बंदुकीनं गोळ्या घालून मुसेवालाचा खून करण्यात आला होता. हल्ल्यानंतर मुसेवाला त्याच्या जीपमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती.

एकूण 23 जखणा मुसेवाला यांच्या शरीरावर झाल्याचं पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमधून समोर आलं होतं. गोळीबाराच्या घटनेनंतर अवघ्या 15 मिनिटांत मुसेवालाचं प्राण सोडला होता. 14 ते 15 गोळ्या मुसेवालाच्या शरीरातून आरपार केल्या होत्या. या गोळ्या त्याच्या शरीराच्या पुढील तीन ते चार तर उजव्या हाताच्या कोपरावर एक गोळी लागली होती. तसंच यकृत किडनी आणि पाठीच्या कण्यालाही गोळी भेदून गेली होती. या हल्ल्यात मुसेवालाच्या शरीरवर तब्बल तीन ते पाच सेंटीमीटर पर्यंतच्या जखमा दिसून आल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी व्हीआयपी सुरक्षा काढून घेतल्यानंतर 48 तासांच्या आतच सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यात आलेली. त्यानंतर आता पुन्हा एकदा पंजाबमध्ये व्हीआयपींना सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी रोज नवनवे खुलासे होत असतानाच आता त्याच्या हत्येचं महाराष्ट्र कनेक्शनही समोर आलंय.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.