CCTV : पुण्यातील तरुण मुंबई गोवा हायवेवर अपघातात ठार! बुलेटस्वारांचा ग्रूप हळहळला

कणकवली-वागदे पेट्रोल पंपासमोर रॉयल इनफिल्ड बाईकच्या अपघाताचा थरार, पाहा व्हिडीओ

CCTV : पुण्यातील तरुण मुंबई गोवा हायवेवर अपघातात ठार! बुलेटस्वारांचा ग्रूप हळहळला
भीषण अपघात...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 18, 2022 | 10:00 AM

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर कणकवली (Kankavali) जवळ एका रॉयल इनफिल्ड (Royal Enfield Bike) बाईकचा भीषण अपघात (Mumbai Goa accident News) झाला. या अपघातात तरुणाचा मृत्यू झालाय. हा अपघात इतका जबर होता की बाईकस्वार तरुणाचा जागीच जीव गेलाय. अपघाताचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालाय. कणकवली वागदे पेट्रोल पंपासमोर ही दुर्दैवी घटना गुरुवारी घडली.

बुलेटस्वार तरुणाचा ग्रूप हा मुंबई गोवा हायवेवरुन जात होता. अभिषेक संजय देसाई हा पुण्यातील हडपसर येथील 22 वर्षीय तरुणही या ग्रूपसोबत प्रवास करत होता. पण या प्रवासादरम्यान काळानं त्याच्यावर घाला घातला.

संध्याकाळी सहा साडे सहा वाजण्याच्या दरम्यान अभिषेकचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि त्याची बाईक अपघातग्रस्त झाली. रॉयल एनफिल्डच्या कार्यक्रमासाठी अभिषेख पुण्याहून गोव्याला जात होता. बुलेटस्वार तरुणांच्या ग्रूपसोबत अभिषेकही सोबत निघाला होता.

एका वाहनाला ओव्हरटेर करण्याच्या नादात अभिषेकचं बुलेटवरील नियंत्रण सुटलं आणि त्याचा बाईकवरील तोल जाऊन तो खाली कोसळला. दरम्यान, हा अपघात घडण्याआधीचे काही क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत.

पाहा व्हिडीओ :

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बुलेटस्वार तरुणांचा ग्रूप हायवेवरुन जाताना दिसलाय. या दरम्यानच अभिषेकची दुचाकी अपघातग्रस्त होते. या अपघातामुळे इतर दुचाकीस्वाराही धास्तावतात आणि लगेच आपआपली वाहन थांबवून अभिषेकच्या दिशेनं धाव घेतात. पण अभिषेकला लागलेला मार इतका जबर असतो, की त्याचा जागीच मृत्यू होतो.

22 वर्षीय अभिषेकच्या अपघाती मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या अपघातामुळे बुलेटस्वार तरुणाच्या ग्रूपमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय. हे सर्व दुचाकीस्वार पुणे ते गोवा असा बुलेटवरुन प्रवास करत होते. मात्र त्यांच्या या प्रवासाला गालबोल लागलंय. या अपघाताची सिंधुदुर्ग महामार्ग पोलिसांनी नोंद केली असून पुढील तपास केला जातोय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.