Pune Fraud :अडीचशेहून अधिक लोकांना नासाच्या नावे लुबाडले, ‘एवढ्या’ कोटींची फसवणूक

अमेरिकेच्या संशोधन संस्था 'नासा’ मधील लोकं भारतात येणार आहेत. यावेळी शास्त्रज्ञ राईस पूलर या यंत्रावर संशोधन होणार आहे. तसेच राईस पूलर या धातुच्या भांड्याला मागणी संपूर्ण जगात आहे. आरोपींनी गुंतवणूकदारांना 1 लाख गुंतवले तर 1 कोटी मिळतील, अशी बतावणी केली.

Pune Fraud :अडीचशेहून अधिक लोकांना नासाच्या नावे लुबाडले, 'एवढ्या' कोटींची फसवणूक
मोठा नफा मिळण्याचे आणिष दाखवत फसवणूकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 2:44 PM

पुणे : नासा, इस्रोमध्ये वापरत असलेल्या राईस पुलर यंत्राच्या विक्रीतून भरपूर मालामाल व्हाल, असे सांगत पुण्यातील 250 पेक्षा अधिक लोकांना गंडा घातल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. नासा, इस्रो यासारख्या संशोधन संस्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या धातूच्या व्यवसायात गुंतवणूक करून मोठा लाभ मिळवण्याचे आमिष दाखवले. मग या टोळीने पुण्यातील 250 हून अधिक लोकांची 6 कोटींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात सर्व आरोपीं विरोधात भारतीय दंडात्मक कलम 406, 420, 467, 468, 471, 120 (ब) आणि 34 सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हित रक्षण अधिनियम 3, 4, 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके तयार

या टोळीमध्ये चार आरोपींचा समावेश आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून या सगळ्यांचा शोध सुरू आहे. आरोपींच्या शोधासाठी पथकं तयार करण्यात आली आहेत. या प्रकरणी राम गायकवाड, रामचंद्र वाघमारे, संतोष सकपाळ, राहुल जाधव या चौघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पंचातारांकित हॉटेलमध्ये गुंतवणुकदारांची बैठक बोलावली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या चारही आरोपींनी गुंतवणूकदारांसाठी एक बैठक बोलावली होती. त्यात एका मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन देखील केले होते.

हे सुद्धा वाचा

1 लाखाच्या गुंतवणुकीवर 1 कोटी देण्याचे आमिष दाखवले

अमेरिकेच्या संशोधन संस्था ‘नासा’ मधील लोकं भारतात येणार आहेत. यावेळी शास्त्रज्ञ राईस पूलर या यंत्रावर संशोधन होणार आहे. तसेच राईस पूलर या धातुच्या भांड्याला मागणी संपूर्ण जगात आहे. आरोपींनी गुंतवणूकदारांना 1 लाख गुंतवले तर 1 कोटी मिळतील, अशी बतावणी केली होती.

250 हून अधिक लोकांची 6 कोटींची फसवणूक

इतकंच काय तर या आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून नागरिकांकडून पैसे जमा केले. पुण्यातील 250 हून अधिक लोकांची जवळपास 6 कोटी रुपयाची फसवणूक झाली असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी दिली.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.