AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलींचे कपडे घालणं भोवलं! शिव्या, लाठ्या, लाथा आणि दे दणादण बुक्के, कुठे झाला राडा?

मुलींच्या वेशात फिरणारा तो संशयास्पद इसम कोण होता? त्याला इतर तरुणांनी का केली जबर मारहाण?

मुलींचे कपडे घालणं भोवलं! शिव्या, लाठ्या, लाथा आणि दे दणादण बुक्के, कुठे झाला राडा?
संशयास्पद इसमाला मारहाणImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 04, 2022 | 11:51 AM
Share

योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे : मुलं चोरणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरल्यात. त्यानंतर राज्याच्या वेगवेगळ्या भागात याच संशयातून अनेकांना मारहाण करण्यात आली. तशा घटना नाशिक (Nashik), सांगली, जळगाव येथून समोरही आल्या होत्या. दरम्यान, आता पुण्यातही (Pune Crime News) एका व्यक्तीला जबर मारहाण (Youth Beaten in Pune) करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीय. ही व्यक्ती मुलीच्या वेशात फिरत होती. ही बाब लक्षात आल्यानंतर काही तरुणांनी या व्यक्तीला जाब विचारला. पण नीट उत्तरं न देता आल्यानं अखेर या व्यक्तीला तरुणांनी जबर मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओही रेकॉर्ड केला.

पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. चकीत करणारी बाब म्हणजे ही व्यक्ती मुलीच्या वेशात होती. या व्यक्तीला काही तरुणांनी जाब विचारला आणि त्यानंतर त्याला मारण्यास सुरुवात केली. शिव्या, लाथा, बुक्के आणि काठ्यांनी या व्यक्तीला अमानुष मारहाण करण्यात आली.

खडकवासला धरणाच्या मागच्या बाजुला असलेल्या पुलावर ही मारहाण झाल्याचं व्हिडीओत दिसून आलंय. या मारहाणीचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. संशयास्पद वर्तवणुकीमुळे या व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याचं बोललं जातंय.

आपण प्रोफेसर आहोत, असा दावादेखील ही व्यक्ती व्हिडीओमध्ये करताना दिसली. त्यानंतर तरुणांनी आणखीनंच संतापाने या व्यक्तीला मारहाण करण्यात सुरुवात केली. खडवासला धरणाच्या मागच्या बाजूला असलेल्या पुलावरील रस्त्यावरच मारहाणीची ही घटना घडली.

आधी नाशिकमध्ये आणि नंतर सांगलीत बुरखा घालून आलेल्या व्यक्तींना मारहाण करण्यात आलेली. रत्नागिरीतही अशीच घटना समोर आलेली. मुलं चोरणारे आहेत असं समजून ही मारहाण करण्यात आलेली होती. त्यानंतर आता पुण्यातही मारहाणीची घटना समोर आलीय.

अद्यापतरी या मारहाणीबद्दल कोणताही गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आलेली नाही. हात जोडून गयावया करत असतानाही काही तरुणांनी अमानुषपणे या व्यक्तीला चोप दिल्याचं व्हिडीओ दिसलंय. या व्यक्तीला शिव्या देताना, लाकडी काठीने त्याच्या शरीरावर जोरदार प्रहार करतानाचा व्हिडीओ अस्वस्थ करणारा आहे.

या व्हिडीओमध्ये मुलीच्या वेषात असलेला व्यक्ती मार खात खात अक्षरशः रडकुंडीला आला होता. तो तरुणांजवळ दयेची भीक मागत होता. पण तरिही तरुणांच्या डोक्यातील राग काही शांत झाला नाही. या व्यक्तीला पळवून पळवून तरुणांनी त्याच्यावर हल्ला केला. तरुणांनी या व्यक्तीला मारहाण करणं सुरुच ठेवल्याचं दिसून आलंय. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता पोलीस नेमकी काय पावलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.