AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ, हॉटेलची तोडफोड; घटना सीसीटीव्हीत कैद

आता पुन्हा एकदा पुण्यातल्या भवानी पेठेत असणाऱ्या एका हॉटेलच्या बाहेर कोयता गँगने दहशत माजवत तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ, हॉटेलची तोडफोड; घटना सीसीटीव्हीत कैद
पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशतImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Jan 06, 2023 | 11:07 PM
Share

पुणे : पुण्यात गुन्हेगारी कमी होण्याचे किंवा थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. दिवसेंदिवस गुन्हेगारांची दहशत वाढतच चालली आहे. शहरात कोयता गँग अधिक सक्रिय झालेली पहायला मिळतेय. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कोयता गँगने राडा घातला होता. याला आठवडा पण झाला नाही तोपर्यंत पुन्हा पुण्यात कोयता गँगने दहशत माजवत एका हॉटेलची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

भवानी पेठेत कोयता गँगने घातला धुमाकूळ

पुण्यात सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, वारजे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कोयता गँगकडून दहशत माजवली होती. आता पुन्हा एकदा पुण्यातल्या भवानी पेठेत असणाऱ्या एका हॉटेलच्या बाहेर कोयता गँगने दहशत माजवत तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे.

हॉटेलमध्ये कोयत्याने तोडफोड

आझम कॅम्पस परिसरातील हॉटेल बाहेर या कोयता गँगने राडा घातला आहे. पाच ते सहा जणांनी हॉटेलमध्ये घुसून कोयत्याने तोडफोड केली आहे. ही घटना हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी नवा वाडा येथे कोयता गँगचा धुमाकूळ

नववर्षाच्या पहिल्या दिवशीही पुण्यातील नवा वाडा येथे कोयता गँगने धुमाकूळ घातला होता. काही तरुणांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. या भांडणातून पाच जणांनी हातात कोयता घेऊन नवा वाडा येथे दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

ही सर्व घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. सीसीटीव्हीच्या आधारे दहशत माजवणाऱ्या पाच आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. यापैकी काही आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.