आमच्या गाडीला कट का मारला? चाकणमध्ये वादात गुंतवून कारमधील 12 लाखांची चोरी
चोरांकडून चोरीसाठी वेगवेगळ्या शक्कल लढवल्या जातात. पुण्यातील चाकणमध्ये 3 जणांनी कारमधून 12 लाख रुपये रोख रक्कम घेऊन जाणाऱ्यांसोबत मुद्दाम वाद केला. त्यांनी रोख रक्कम असलेल्या कारला अडवून कार चालकासोबत आमच्या मोटारसायकलला कट का मारला असा जाब विचारत वाद केला. दोघांनी चालकाला वादात गुंतवून ठेवलं आणि एकाने त्याचा फायदा घेत कारमधील 12 लाख रुपयांची रोकड चोरली.
पुणे : चोरांकडून चोरीसाठी वेगवेगळ्या शक्कल लढवल्या जातात. पुण्यातील चाकणमध्ये 3 जणांनी कारमधून 12 लाख रुपये रोख रक्कम घेऊन जाणाऱ्यांसोबत मुद्दाम वाद केला. त्यांनी रोख रक्कम असलेल्या कारला अडवून कार चालकासोबत आमच्या मोटारसायकलला कट का मारला असा जाब विचारत वाद केला. दोघांनी चालकाला वादात गुंतवून ठेवलं आणि एकाने त्याचा फायदा घेत कारमधील 12 लाख रुपयांची रोकड चोरली. ही घटना रविवारी (8 ऑगस्ट) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास चाकणमधील तळेगाव चौकात घडली.
कामगारांच्या पगाराचे पैसे चोरट्यांकडून लंपास
पीडित कार चालक बोऱ्हाडे संगमनेर येथील के के थोरात या कंपनीचे लेखापाल आहेत. त्यांच्यासोबत कार चालक सुरेश गायकवाड होते. हे दोघे कंपनीतील कामगारांचे पगार करण्यासाठी कारमधून 12 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन जात होते. मात्र, चाकणमधील तळेगाव चौकात त्यांच्या कारला तिघांनी अडवत कट मारल्याचा दावा करत वाद केला. या वादात गुंतवून ठेवतानाच त्यातील एकाने कारमधील 12 लाख लंपास केले.
चाकण पोलिसांनी चोरांच्या मुसक्या आवळल्या
विशेष म्हणजे चाकण पोलिसांनी या घटनेनंतर तात्काळ तपास सुरू करत या प्रकरणातील चार जणांना अटक केलीय. समीर सोनवणे, अक्षय सोनवणे, प्रदीप नवाळे आणि सुरेश गायकवाड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा :
टॉयलेटला जाणाऱ्या ड्रायव्हरची रिक्षा चोरायची, फिरवायची, गॅस संपेल तिथे सोडून जायचं, टॉयलेट रिक्षाचोर जेरबंद
ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशांच्या मोबाईलवर डल्ला, 20 वर्षीय अट्टल चोरट्याला अटक
कपाटाचे कुलूप दुरुस्त करायला बोलावलं, दोघांनी कपाटातून दागिन्यांसह 69 हजार लांबवले
व्हिडीओ पाहा :
Theft of Rs 12 lakh from thieves by involving in dispute in Chakan Pune