गावठी पिस्तूल आणि तलवारीचा धाक दाखवून लुटमार करणारी टोळी गजाआड, पुणे पोलिसांची मोठी कारवाई
गावठी पिस्तूल आणि तलवारीचा धाक दाखवून लुटमार करणारी टोळी पुणे पोलिसांनी गजाआड केली आहे. पुणे पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखाने या टोळीला जेरबंद केलंय.
पुणे : गावठी पिस्तूल आणि तलवारीचा धाक दाखवून लुटमार करणारी टोळी पुणे पोलिसांनी गजाआड केली आहे. पुणे पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखाने या टोळीला जेरबंद केलंय.
पुणे सातारा महामार्गावरील वरवे गावातील भंगार व्यावसायिक कुरबान इन्सान अली यांच्या घरावर दरोडा टाकून लूटमार करून ही टोळी पळाली होते. या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी काही तासात गुन्हेगारांना मुद्देमालासह चार जणांना पकडले आहे. सापळा रचून या टोळीला अटक करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांकडून आरोपींना बेड्या
पोलिसांनी माहिती दिली की, “आपण आता 5 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 14 तारखेला रात्री 2 वाजता भंगारवाल्याला रिव्हॉल्ववरचा धाक दाखवून 35 हजार रुपये या टोळीने लुटले होते. पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेत तसंच आणखी काही माध्यमातून चोरट्यांना अटक केलीय. राजगडच्या हद्दीतच आरोपी लपून बसले असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तिथे जाऊन त्यांना पकडलं.त्यावेळी 1 वेपन, चोरीस गेलेला मोबाईल, तलवारी, असा ऐवज जप्त केला”
आरोपींच्या मेडिकल टेस्ट करुन पुढील कारवाईसाठी राडगड पोलिसांच्या हवाली करण्यात आलं आहे. सर्वसाधारणपणे हे आरोपी मजूर वर्गातले आहेत. त्यांना पैशांची गरज असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून चोरी करत असल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुण्यात चालकाने मालकाची 22 लाखांची कार पेटवली
कामावरून काढून टाकल्याच्या रागातून चालकाने मालकाची 22 लाखांची कार पेटवली. ही घटना पुण्यातील भोसरीलगतच्या इंद्रायणीनगर येथे घडली. सोमवारी पहाटे चालकाने मालकाची 22 लाखांची कार पेटवून दिली.
चालकाला कामावरून काढल्याच्या रागातून चालकाने आपल्या भावाला सोबत घेऊन मालकिनीची कार जाळून टाकली. याबाबत कारच्या मालकीनीने भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
विनोद किसनराव भस्के आणि अंकित किसनराव भस्के अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे नाव आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गुन्हा केल्यापासून आरोपी फरार असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय.
सविस्तर घटना काय?
आरोपी विनोद भस्के हा फिर्यादी महिलेकडे कारवर चालक म्हणून कामाला होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याला फिर्यादी महिलेनं कामावरून काढून टाकले होते. या कारणामुळे संतापलेल्या आरोपी विनोद याने आपल्या भावासोबत इंद्रायणीनगर, भोसरी येथील तिलक रेसिडन्सी येथे येऊन कारवर स्फोटक द्रव्य टाकून 22 लाख रुपयांची कार जाळून टाकली.
(thieves Arrested From Rajgad by pune police Over Robbing 35 thousand )
हे ही वाचा :
सोनू सूद कर वाचवण्यासाठी काय करायचा; CBDT ने सांगितली मोडस ऑपरेंडी
जाचाला कंटाळून विवाहितेचा गळफास, माहेरच्यांनी सासरच्या दारातच चिता पेटवली
आई शेतात गेली, नराधमांकडून गतिमंद तरुणीवर घरात घुसून बलात्कार, महाराष्ट्रातील अत्याचार थांबेनात!