पुण्यात महिलेला वडापाव खाण्याची इच्छा पडली 8 लाखांना! रक्षबंधनाच्याच दिवशी घडली घटना

पुण्यात एक अशी घटना समोर आली आहे ज्यात एका महिलेला वडापाव खाण्याच्या इच्छेपायी तब्बल 8 लाखांचा फटका बसला आहे. सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली बॅग कारमध्येच ठेवून वडपाव आणण्यासाठी गेलेल्या महिलेची बॅग चोरट्यांनी लंपास केली आहे.

पुण्यात महिलेला वडापाव खाण्याची इच्छा पडली 8 लाखांना! रक्षबंधनाच्याच दिवशी घडली घटना
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 3:55 PM

पुणे : वडापाव (Vadapav) आवडत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. कधीही इच्छा झाली की, वडापावच्या दुकानाकडे पाऊलं आपोआप वळतात. पण पुण्यात एक अशी घटना समोर आली आहे ज्यात एका महिलेला वडापाव खाण्याच्या इच्छेपायी तब्बल 8 लाखांचा फटका बसला आहे. सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली बॅग कारमध्येच ठेवून वडपाव आणण्यासाठी गेलेल्या महिलेची बॅग चोरट्यांनी लंपास केली आहे. त्यात तब्बल 8 लाखांचा ऐवज होता. 24 ऑगस्टला संध्याकाळी सातच्या सुमारास धनकवडी (Dhankawadi) इथल्या अहिल्यादेवी चौकात ही घटना घडली आहे. (Thieves have stolen jewellery worth Rs 8 lakh from a woman’s car who went to take Vadapav)

रक्षाबंधनाच्या दिवशी घडली घटना

पुण्यातील 35 वर्षीय महिला रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावाला राखी बाधण्यासाठी गेल्या होत्या. भावाला राखी बाधल्यानंतर त्यासंध्याकाळी आपल्या कारने घरी परतत होत्या. सहकारनगर परिसरातल्या अहिल्यादेवी चौकात आल्यावर त्यांना वडापाव खाण्याची इच्छा झाली. तेव्हा एका वडापावच्या दुकानासमोर त्या वडापाव घेण्यासाठी थांबल्या.

त्यांच्या गाडीत सोन्याचे दागिणे आणि काही रोकड असणारी एक बॅग होती. कारमधून उतरत असताना त्यांनी ही बॅग डाव्या बाजूच्या सीटवर ठेवली आणि त्या वडापाव घेण्यासाठी उतरल्या. यादरम्यान चोरट्यांनी संधी साधली आणि कारमध्ये ठेवलेली बॅग घेऊन धूम ठोकली.

सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध

चोरट्यांनी बॅगमध्ये असलेले 10 हजार रुपये रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा साधारण 8 लाखांचा ऐवज लंपास केला. वडापाव घेऊन परत आल्यानंतर बॅग गायब झाल्याचं महिलेच्या लक्षात आलं. त्यानंतर लगेचच त्यांनी सहकारनगर पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांखाली अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परिसरातल्या सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे तपास करीत आहेत.

इतर बातम्या :

पत्नीने दरवाजा न उघडल्याचा राग, नाराज नवऱ्याने ओढणीने गळा आवळून जीव घेतला

दारुच्या गुत्त्यावर किरकोळ वाद, नागपुरात तिघा मित्रांकडून तरुणाची हत्या

VIDEO | औरंगाबादच्या उच्चभ्रू वस्तीत 16-17 गाड्यांची तोडफोड, मध्यरात्री हुल्लडबाजांचा धुमाकूळ

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.