Pune crime | प्रियसीने धोका दिल्याने २३ वर्षीय तरुणाने उचलेले ‘हे’ पाऊल
दिपकची कोरोनाच्या काळात प्रशांतची नोकरी गेली होती. तो एका मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात काम करीत होता. मागील काही वर्षापासून त्याचे नऱ्हे परिसरात राहणाऱ्या एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. परंतु या तरुणीच्या मामाला या दोघांचे संबंध मान्य नव्हते.

पुणे – शहरातील कोथरूड परिसरात प्रियसीने केलेली फसवणूक व तिच्या मामाच्या सततच्या धमक्यांना कंटाळून २३ व वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरूणानाने लिहिलेल्या सुसाईड नोटयामध्ये हा या प्रकार उघडकीस आला आहे. प्रशांत उर्फ मोन्या दीपक कदम (वय 23) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची प्रेयसी आणि तिचा मामा या दोघांविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत प्रशांत कदम याच्या आईने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
मृत दिपकची कोरोनाच्या काळात प्रशांतची नोकरी गेली होती. तो एका मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात काम करीत होता. मागील काही वर्षापासून त्याचे नऱ्हे परिसरात राहणाऱ्या एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. परंतु या तरुणीच्या मामाला या दोघांचे संबंध मान्य नव्हते. त्यामुळे प्रशांत हा कायम तणावात असायचा . आपली प्रेयसी त्याला सोडून जाईल अशी त्याला भीती वाटायची.
मामाने दिली धमकी 15 नोव्हेंबर रोजी प्रशांतच्या घरी प्रेयसीचा मामा आला होता. त्याने प्रेयसीचा नाद सोडून दे असे म्हणत प्रशांतला शिवीगाळ करत धमकी दिली होती. या सर्व प्रकारामुळे प्रशांत नैराश्यात गेला होता. त्यानंतर त्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली. त्यात “मी मोन्या कदम, मी आयुष्यात प्रेम केलं परंतु प्रेयसीने मला फसवले आणि तिच्या मामाने मला धमकी दिली. त्या मुलीने मला धोका दिला म्हणून मी हे कृत्य केलं” असा मजकूर लिहिलेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Shirdi : शिर्डी नगरपंचायत होणार नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक रद्द होणार?
Kangana Ranaut | पंजाबच्या शेतकऱ्यांनी कंगना रनौतला घेरलं, कार अडवत माफी मागण्याची केली मागणी