AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात गुंडांच्या गोळीबारात मारला गेलेला कुख्यात गुंड शरद मोहोळ कोण होता?

पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञातांनी शरद मोहोळवर गोळीबार केला. त्याची हत्या नेमकी कुणी केली, ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण त्याच्या हत्येनंतर पुण्यात पुन्हा एकदा टोळीयुद्धाच्या घटनांची चर्चा सुरु झालीय.

पुण्यात गुंडांच्या गोळीबारात मारला गेलेला कुख्यात गुंड शरद मोहोळ कोण होता?
Follow us
| Updated on: Jan 05, 2024 | 6:40 PM

पुणे | 5 जानेवारी 2024 : चांगलं पेरलं तर चांगलं उगवतं आणि वाईट पेरलं तर वाईटच उगवणार हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे आई-वडील आपल्या मुलांना लहानपणापासून चांगले संस्कार लावण्याचे प्रयत्न करत असतात. काही वेळेला मुलं बिघडण्यामागे तो मुलगा राहत असलेल्या परिसरातील वातावरण देखील कारणीभूत ठरु शकतं किंवा त्या मुलाच्या घरची आर्थिक परिस्थिती, तिथल्या परिसरातील नागरिकांची आर्थिक अवस्था या कारणीभूत ठरु शकतात. पण तरीही चांगल्या मार्गाने, मेहनत करुन पैसे कमविण्याची नीतीमत्ता राहिली तर आयुष्यात नक्कीच यश संपादीत करता येऊ शकतं, इतकं सोपं हे जगणं आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष हा पाचविला पुजलेला असतो. अगदी देवाऱ्यात लावलेल्या दिव्याला देखील तो तेवत राहण्यासाठी संघर्ष करावा लागतो. या दिव्याला वाऱ्याचा संघर्ष करायचा असतो. त्यामुळे आपण माणूस आहोत. आपल्या नशिबात संघर्षाशिवाय दुसरं काही असूच शकत नाही. पण काहीजण आराजकतेची वाट पकडतात, नको त्या दिशेला आकर्षित होत जातात आणि आयुष्याचं वाटोळं करुन बसतात. यांसारख्या अनेक कारणांमुळे गुन्हेगाराचा जन्म होतो, हा गुन्हेगार गुन्हेगारी विश्वात हैदोस माजवतो, कित्येकांचा जीव घेतो, अपहरण करतो, खंडणी वसूल करतो आणि शेवटी त्याचा अंत देखील तितकाच वाईट होतो.

पुण्यातला टोळी युद्धाचं वास्तव सांगणारा ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपट सर्वांनी पाहिला आहे. आता हे टोळीयुद्ध चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे पुण्यातला कुख्यात गुंड शरद मोहोळची झालेली हत्या. या शरद मोहोळची पुण्याच्या कोथरुड परिसरात दहशत होती. पण याच कोथरुडमध्ये त्याचा अंतही झाला. कोथरुडच्या सुतारदरामध्ये बाईकवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी शरद मोहोळवर गोळ्या झाडल्या. शरद मोहोळवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या हल्ल्यानंतर त्याला पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शरद मोहोळच्या मृत्यूनंतर ससून रुग्णालयात त्याच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी जमा झालीय. या हत्येनंतर शरद मोहोळ कोण होता? असा प्रश्न राज्यातील अनेकांना पडलाय.

शरद मोहोळे कोण होता?

शरद मोहोळ हा मोहोळ गँगचा म्होरक्या होता. पुण्यात 2006 मध्ये गुंड संदीप मोहोळ याच्या हत्येनंतर शरद मोहोळ हा मोहोळ गँगचा म्होरक्या बनला होता. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण सारख्या अनेक गुन्ह्यांची नोंद होती. त्याच्यावर गज्या मारणे टोळीतील गुंड पिंटू मारणेची हत्या केल्याचा आरोप होता. या खटल्यात तो जामिनावर बाहेर आला होता. पण त्यानंतरही त्याची कूकृत्य सुरुच होते. त्याने दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे अपहरण केलं होतं. या प्रकरणी त्याला पोलिसांनी पुन्हा अटक केली होती. पण अटकेनंतरही तो जेलमध्ये शांत राहिला नाही.

कतील सिद्दीकी याचा जेलमध्ये खून

शरद मोहोळने येरवडा कारागृहात गुंड विवेक भालेराव याच्यासोबत मिळून दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या कतील सिद्दीकी याचा खून केला होता. या प्रकरणी त्याला गेल्या वर्षी जामीन मिळाला होता. त्यानंतरही त्याने गुन्हेगारी करणं सोडलं नव्हतं. त्याने खंडणीसाठी धमकवल्याप्रकरणी त्याच्याविरोधात खडकमाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याला जुलै 2022 मध्ये पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलं होतं.

मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो व्हायरल

या दरम्यानच्या काळात त्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमधील हा फोटो असल्याचा दावा केला जात होता. या फोटवरुन मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याच्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व घटनांनंतर शरद मोहोळ याच्या पत्नीने भाजपात प्रवेश केला होता.

पुण्याचे कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत त्याच्या पत्नीने भाजपात प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशामुळे भाजपवर देखील टीका करण्यात आली होती. त्यानंतर शरद मोहोळ याच्यावर आज गोळीबार झाल्याची बातमी समोर आली. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झालाय. शरद मोहोळच्या मृत्यूनंतर आता पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा उद्रेक होऊ नये, अशी आशा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.

विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.
पाकिस्तानला पाण्याचा थेंबा-थेंबासाठी तरसवण्याची तयारी सुरू
पाकिस्तानला पाण्याचा थेंबा-थेंबासाठी तरसवण्याची तयारी सुरू.
अगर जंग छिडी तो..', मौलवींचा सवाल अन् पाकच्या नागरिकांची अजब रिअ‍ॅक्शन
अगर जंग छिडी तो..', मौलवींचा सवाल अन् पाकच्या नागरिकांची अजब रिअ‍ॅक्शन.
पाकिस्तानला तुर्कीएचा उघड पाठिंबा; कराची बंदरात युद्धनौका दाखल
पाकिस्तानला तुर्कीएचा उघड पाठिंबा; कराची बंदरात युद्धनौका दाखल.
हवाईदलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसाशिवाय गुप्त माहिती कळणार
हवाईदलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसाशिवाय गुप्त माहिती कळणार.
वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर
वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर.
भारतानं पाकचं पाणी रोखल, खळखळून वाहणाऱ्या 'चिनाब'ची अवस्था नाल्यासारखी
भारतानं पाकचं पाणी रोखल, खळखळून वाहणाऱ्या 'चिनाब'ची अवस्था नाल्यासारखी.